‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे नेहमीच चर्चेत असतो. ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा गौरवचा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. या डायलॉगबरोबर गौरवची होणारी एन्ट्री त्याच्या केसांमुळे हिट ठरते. विनोदी शैलीबरोबरच त्याची केसांची हेअरस्टाईल खूप लोकप्रिय आहे. पण मानेपर्यंत असलेले केस गौरवनं आता कानावरपर्यंत कापले आहेत. त्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. पण हे केस त्यानं प्रसाद ओकच्या एका आगामी चित्रपटाच्या निमित्तानं कापल्याचं जाहीर केलं आहे.
गौरवचा ‘अंकुश’ हा आगामी चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. याचनिमित्तानं ‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी गौरवनं संवाद साधला. यावेळी त्याला विचारलं की, ‘जेव्हा तू या लूकमध्ये स्वतःला पहिल्यांदा आरशात पाहिलंस तेव्हा काय वाटलं?’ यावर गौरव म्हणाला की, “माझी ही खरी कॉलेजमधली हेअरस्टाईल आहे. पूर्वी मला कानावरती केस आले की आवडायचं नाही. पण आता असं झालं की, मी एक नवीन चित्रपट करतोय ‘परिनिर्वाण’. त्यासाठी दिग्दर्शक आणि डिझायनरनं सांगितलं, गौरव आपल्याला थोडं चेंज करावं लागेल. चित्रपटात जुना काळ आहे. त्यामुळे मी म्हटलं, ठीक आहे.”
हेही वाचा – Jaane Jaan: करीना कपूरचं ओटीटीवर दमदार पदार्पण; थ्रिलर चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका, टीझर आला समोर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित ‘परिनिर्वाण’ हा चित्रपट असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी त्यांचे निर्वाण झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा हा ऐतिहासिक क्षण या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
हेही वाचा – व्याख्यानं फुकट देण्याच्या मागणीवर अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, “मी मेलो तरी…”
दरम्यान, गौरवच्या कामाबद्दल बोलायचं झालं, लवकरच तो एका हिंदी चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. ‘सांगी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अभिनेता शरिब हाशमी आणि विद्या माळवदे यांची प्रमुख भूमिका आहे.