‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे निखिल बने. नुकतंच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने एका नाटकाबद्दल भाष्य केले आहे.
निखिल बनेने नुकतंच “कडेकोट कडेलोट” हे एकपात्री नाटक पाहिलं. यानंतर आता निखिल बनने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने हे नाटक कसं वाटलं? याबद्दल सांगितले आहे. तसेच त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत.
आणखी वाचा : “कॉलेजपासून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्नेहलबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन
निखिल बनेची पोस्ट
“आज “कडेकोट कडेलोट” या एकपात्री नाटकाचा प्रयोग पाहीला. बऱ्याच वर्षांनी “प्रयोग” बघितल्याचा आनंद झाला. ह्या प्रयोगाची खरी गंमत हा प्रयोग अनुभवण्यात आहे. या नाटकात एक “चौकट” आहे तरीही हे “चौकटि बाहेरच” नाटक आहे आणि सगळ्या चौकटि मोडणार नाटक आहे जस की (अरे एवढ्या पैशात नाटक नाही होणार, लाइट्स नाही आहेत आपल्याकडे,नेपथ्य कसं करायचं अश्या आणि अश्या अनेक चौकटि मोडणार हे नाटक). माणसाच्या भावना बोथट होतायत का? याची जाणीव करून देणार हे नाटक. हे नाटक बघताना नकळत आपण माणूस म्हणून स्वतःला पडताळून बघतो आणि हीच ह्या नाटकाची ताकद आहे.या नाटकात काही संवाद असे आहेत ज्यावर आपल्याला हसू येत पण लगेच जाणीव होते की आपण हसतोय या गोष्टीवर ही ह्या नाटकाची गंमत आहे. नाटकाच्या पहिल्या संवादापासून प्रेक्षकांना प्रयोगात घेऊन जाणार हे नाटक.
हे मूळ इटालियन नाटक आहे “A women Alon” आणि या नाटकाचं रूपांतरण अमोल पाटील दादाने केलंय. कमला आहेस तू दादा. गोष्ट कशी लिहायची हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे, शब्द नाहीत दादा तुझ्यासाठी. कल्पेश समेळ या आमच्या मित्राने या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. कॉलेजपासून आमची मैत्री, नाटकासाठीची त्याची धडपड तेव्हापासून जी सुरू झाली ती अजून सुरूच आहे. सुंदर असं दिग्दर्शन केलंय मित्रा असेच नवनवीन प्रयोग करत रहा आणि तुझी ही नाटकाची चळवळ चालु ठेव.
हे नाटक ज्या व्यक्तीच्या भोवती फिरत ती म्हणजे या नाटकाची अभिनेत्री प्रतीक्षा खासनीस. तू कमालीची अभिनेत्री आहेस तू काही बोलण्याआधी तुझे डोळे बोलतात इथेच तू जिंकतेस सगळं. अस एकपात्री नाटक सादर करण खूप कठीण गोष्ट आहे पण तू या नाटकात खूपच सहज आणि सुंदर अभिनय करतेस त्यामुळे हे नाटक त्या क्षणी घडतंय अस वाटत राहत कायम.
हे असे प्रयोग खूप दुर्मिळ झाले आहेत. अशी नाटक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि हे असे प्रयोग आपणच लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. या नाटकाचा पुढचा प्रयोग २५ मार्च, संध्याकाळी ६ वा,मृणालताई दालन, केशवराव गोरे स्मारक ट्रस्ट सभागृह,आरे रोड,गोरेगाव (पश्चिम) इथे आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की जा फक्त १ तासाचा हा प्रयोग आहे.
टायनी टेल्स थिएटर कंपनीची एक खासियत आहे यांच्या “OTT platform” च “subscription” घ्यावं लागतं नाही ही नाटकवेडी लोक तुमच्या घरी,चाळीत, गावात,गच्चीत, पाड्यात कुठेही येऊन प्रयोग करतात. ते नाटक घेऊन तयार आहेत फक्त प्रेक्षकांची वाट बघतायत”, असे निखिल बनेने यात म्हटले आहे.
आणखी वाचा : “तुम्ही जे बोलता…” तेजस्विनी पंडितने नागराज मंजुळेंबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर आकाश ठोसरची प्रतिक्रिया
दरम्यान छोट्या पडद्यावरुन महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून निखिल बनेला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी निखिल बने आणि ‘चला हवा येऊ द्या’ या फेम अभिनेत्री स्नेहल शिदम या दोघांनी एक गोड फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे तो चर्चेत होता. मात्र त्यानंतर त्याने यावर स्पष्टीकरण दिले होते.