छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही हा कार्यक्रम प्रेक्षक आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री शिवाली परब. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणाऱ्या शिवाली सध्या एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
शिवाली कायमच इन्स्टाग्रामवर विविध फोटो शेअर करताना दिसते. नुकतंच शिवालीने इन्स्टाग्रामवर एका फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात शिवालीने काळ्या रंगाचा एक गाऊन परिधान केला आहे.
आणखी वाचा : “माझे वडील रिक्षा चालवायचे, आई घरी शिवणकाम करायची; पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे…” शिवाली परबचा खुलासा
यातील एका फोटोत शिवालीने तिच्या पायाला काळ्या रंगाचा कपडा बांधल्याचे दिसत आहे. त्यावरुन एका नेटकऱ्याने तिला प्रश्न विचारला आहे. “पायाला साप चालल्यावर आमच्या गावाकडे असा बांधतात आणि असाच पाय काळा निळा पडतो”, असे तिला एकाने म्हटले आहे.
यावर शिवालीनेही त्याला प्रतिक्रिया दिली आहे. शिवालीने यावर हसतानाचे दोन इमोजी शेअर करत त्यावर उत्तर दिले आहे. शिवालीच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, म्हणाली…
दरम्यान शिवाली परबने ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात काम केले होते. यात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी केली आहे.