Maharashtrachi Hasya Jatra Show : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मराठमोळा विनोदी कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नव्हे जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या शोमधील कलाकार अनेकदा सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई असे दौरे करत आपल्या विनोदी शैलीने परदेशात राहणाऱ्या मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. प्रेक्षकांना विनोदाचं अचूक टायमिंग साधत खळखळून हसवणारे आणि जगभरात शो करणारे हे विनोदवीर शूटिंगमधून वेळ मिळाल्यावर वैयक्तिक आयुष्यात धमालमस्ती करत असल्याचं पाहायला मिळतं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सगळे कलाकार आता पावसाळी ट्रिपला गेले आहेत. याचा खास फोटो वनिता खरात इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. हास्यजत्रेने बऱ्याच नवोदित कलाकारांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. वनितासह प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने, निखिल बने यांच्यासारखे अनेक कलाकार हास्यजत्रेमुळे आजच्या घडीला घराघरांत लोकप्रिय आहेत. नुकतेच हे कलाकार पावसाठी ट्रिपला गेले होते.

prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
sonam wangchuck marathi news,
जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे नागपुरात “हेरिटेज ट्री वॉक”
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
truti dimri left aashiquie 3
Aashiqui 3 चित्रपटातून ‘या’ अभिनेत्रीचा पत्ता कट? याआधीच्या बोल्ड भूमिका ठरल्या कारणीभूत

हेही वाचा : अथिया शेट्टीला चित्रपटात घेणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरला सुनील शेट्टीने दिला बंगला; म्हणाला, “मुंबईतील सर्वात…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे ( Maharashtrachi Hasya Jatra ) कलाकार पोहोचले ट्रिपला

वनिताने फोटो शेअर करत त्यावर “पावसाळी सहल इज मँडेटरी” असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये वनितासह ओंकार राऊत, निखिल बने, रोहित माने व रसिका वेंगुर्लेकर यांची झलक पाहायला मिळत आहे. यावरून हे सगळे कलाकार मिळून पावसाठी ट्रिपला गेल्याचं स्पष्ट झालं आहे.

वनिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये सगळ्या कलाकार मंडळींच्या हातात भाजलेलं मक्याचं कणीस पाहायला मिळत आहे. भर पावसात ट्रिपला जाताना हास्यजत्रेच्या या टीमने वाटेत भाजलेलं मक्याचं कणीस खाल्लं व त्यानंतर पुढील प्रवास चालू केला.

हेही वाचा : ‘देवयानी’ पाठोपाठ ‘स्टार प्रवाह’वर येणार संग्राम! ‘या’ मालिकेत घेणार धमाकेदार एन्ट्री, तब्बल ६ वर्षांनी पुनरागमन

vanita
वनिता खरातने शेअर केलेला फोटो चर्चेत ( Maharashtrachi Hasya Jatra )

हेही वाचा : Tisha Kumar च्या अंत्यसंस्कारानंतर स्मशानातून हसत बाहेर पडला बॉलीवूड अभिनेता; संतापलेले नेटकरी म्हणाले, “मृत्यूचा तमाशा…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रत्येक कलाकाराचा साधेपणा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात भावतो. त्यामुळेच या सगळ्या कलाकारांना आणि हास्यजत्रेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं. काही दिवसांपूर्वी वनिता खरातच्या वाढदिवसानिमित्त हे सगळे कलाकार एकत्र जमले होते. याचे देखील फोटो व व्हिडीओ वनिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Story img Loader