‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नम्रता संभेराव नेहमी चर्चेत असते. कार्यक्रमाव्यतिरिक्त नम्रता सोशल मीडियावरूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करीत असते. ती नवनवीन रील्स आणि फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते. विनोदी शैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या नम्रतानं आपल्या आवाजानंही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपासून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना गाणी गाऊन दाखवत आहे. तिच्या या व्हिडीओंनाही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतीच नम्रतानं एक रील शेअर केली आहे; ज्यामध्ये तिच्यासाठी एक मराठमोळी अभिनेत्री खास चहा बनवताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री नम्रता संभेरावनं शेअर केलेल्या या रीलमध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले तिच्यासाठी चहा बनवताना दिसत आहे. त्यानंतर दोघी चहाचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात. नम्रतानं ही रील शेअर करीत लिहिलं आहे, “चाय विथ भार्गवी ताय” या रीलवर चाहते लाइक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करीत आहेत.

हेही वाचा – कोरोना, ब्रेनस्ट्रोक अन् पॅरेलिसिसची शिकार; शाहरुख खानबरोबर झळकलेल्या अभिनेत्रीने ‘अशी’ केली गंभीर आजारावर मात

नम्रता आणि भार्गवीच्या या रीलला आतापर्यंत २२ हजार व्ह्युज मिळाले आहेत; तर एक हजारहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. यापूर्वी नम्रताचा अंगाई गातानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. ‘निज निज रे बाळा’ ही अंगाई तिनं समस्त आयांना समर्पित करीत गायली होती. तिची ही अंगाई ऐकून चाहत्यांनी नम्रताच्या आवाजाचं खूप कौतुक केलं होतं.

हेही वाचा – सहकुटुंब सहपरिवार मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, शूटींगचा शेवटचा व्हिडीओ समोर

हेही वाचा – “हॉलीवूड अमूक, हॉलीवूड तमूक…”, शाहीद कपूरच्या पत्नीचे ‘बार्बी’ चित्रपटाबद्दल वक्तव्य; म्हणाली…

दरम्यान, अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरचा तिचा एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीनं यासंबंधी एक व्हिडीओ शेअर करून माहिती दिली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra actress namrata sambherao share reel with bhargavi chirmuley pps