Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम केवळ देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत या शोमधल्या सगळ्या कलाकारांनी गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक चर्चेत आला होता. या शोमधील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी हास्यजत्रेची टीम अनेकदा परदेश दौऱ्यावर जात असल्याचं पाहायला मिळतं. यापूर्वी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई या देशांमध्ये कार्यक्रमाचे शो पार पडले आहेत. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची टीम पुन्हा एकदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेली आहे. मंगळवारी रात्री उशिरा हे कलाकार मुंबईतून अमेरिकेच्या दिशेने रवाना झाले. येत्या १९ तारखेपासून अमेरिकेतल्या एकूण ११ शहरांमध्ये ही टीम शो घेणार आहे.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Vivek Oberoi shifted to Dubai
तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”

हेही वाचा : Video : “हिशोब सांगते ऐका…”, ५९ वर्षांपूर्वीच्या मराठी गीतावर नारकर जोडप्याने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, “ढोलकीचा ताल…”

विमानतळावर केला स्किटचा सराव

अमेरिकेत पोहोचल्यावर लगेच शो असल्याने या सगळ्या कलाकारांनी चक्क पॅरिसच्या विमानतळावर बसून स्किटचा सराव केल्याचं पाहायला मिळालं. चेतना भटने याचा खास फोटो शेअर केला आहे. “पॅरिस विमानतळावर आमची रिहर्सल” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये सगळे कलाकार आपआपलं स्किट वाचत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा खास सेल्फी प्रसाद खांडेकरने काढला आहे. हास्यजत्रेची टीम विमानतळावर आगामी स्किटचा सराव करतेय हे पाहून चाहत्यांसह नेटकऱ्यांनी या टीमचं भरभरून कौतुक केलं आहे.

दरम्यान, १९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीदरम्यान एकूण ११ शहरांमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे ( Maharashtrachi Hasya Jatra ) शो होणार आहेत. अनुक्रमे शार्लोट, वॉशिंग्टन डीसी, बोस्टन, न्यू जर्सी, शिकागो, डॅलस, ऑस्टिन, ह्युस्टन, सिएटल, सॅन जोस, लॉस एंजेलिस या शहरांमध्ये हे शो आयोजित करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Video : ‘बिग बॉस’च्या घरात गॅस वापरावर निर्बंध, सगळ्यांचा उडणार गोंधळ! तर, ‘या’ गोष्टीमुळे वर्षा-निक्कीमध्ये होणार वाद

Maharashtrachi Hasya Jatra
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कलाकारांनी विमानतळावर केला सराव ( Maharashtrachi Hasya Jatra )

दत्तू मोरे, रसिका वेंगुर्लेकर, इशा डे, चेतना भट, समीर चौघुले, नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रभाकर मोरे आणि प्रसाद खांडेकर हे कलाकार अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असून, ही सगळी मंडळी ( Maharashtrachi Hasya Jatra ) तिथे काय-काय धमाल करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.