‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. मे २०२३ मध्ये हे सगळे हास्यवीर अमेरिका दौऱ्यावर गेले होते. परदेशातही या कलाकारांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच आता हास्यजत्रेतील कलाकारांच्या पुढच्या दौऱ्याची तारीख ठरली आहे. आता कलाकारांचा पुढचा दौरा केव्हा व कुठे असणार जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हास्यजत्रेच्या कलाकारांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत पुढच्या दौऱ्याबाबत माहिती दिली. हे सगळे कलाकार पुढच्या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनीला जाणार आहेत. समीर चौघुले याबद्दल लिहितात, “तुमची लाडकी महाराष्ट्राची हास्यजत्रा सिडनीमध्ये…आता प्रतीक्षा संपली. आम्ही ९ मार्च २०२४ रोजी सिडनीत तुम्हाला भेटायला येतोय.”

हेही वाचा : ‘सिटी ऑफ ड्रीम्स’नंतर प्रिया बापटच्या हाती मोठा प्रोजेक्ट! बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्याबरोबर करणार काम, म्हणाली…

सिडनी दौऱ्याविषयी पृथ्वीक प्रताप म्हणतो, “ऑस्ट्रेलियाने इथे येऊन आपल्याला हरवलं आता आम्ही तिथे जाऊन त्यांची मनं जिंकणार!” नेटकऱ्यांनी या पोस्टवर भन्नाट कमेंट्स करत “ऑस्ट्रेलियाला खूप हसवा आणि आपला वर्ल्डकप परत घेऊन या” अशा कमेंट्स केल्या आहेत.

पृथ्वीक प्रताप

हेही वाचा : “…आणि माझ्या आयुष्यात राजकुमार आला”, नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट; म्हणाली, “त्याने मला…”

दरम्यान, पुढच्या वर्षी ९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता (ऑस्ट्रेलियातील वेळेनुसार) UNSW विज्ञानगृहात हा प्रयोग पार पडणार आहे. अमेरिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल विनोदवीरांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.