‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो मराठी जनतेला खळखळून हसवतो. या शोच्या निर्मात्यांपासून ते कलाकार सगळेच प्रेक्षकांच्या ओळखीचे झाले आहेत. प्रेक्षकांना या विनोदी शोमधील कलाकारांबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. सध्या हा शो सुरू नसला तरी त्याची चर्चा मात्र होतच असते. या शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचा आवडता विनोदवीर कोण आहे, याबद्दल सांगितलं.

Video: नालासोपारामध्ये ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा शो पाडला बंद, आंदोलकांनी मल्टिप्लेक्स कर्मचाऱ्यांशी घातली हुज्जत

Anti farmer ideology of Modi government
लेख : शेतकरीहिताची ‘चित्रफीत’; राष्ट्रहित की मित्रहित?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
CM Eknath Shinde Atul Parchure
Atul Parchure : “अतुल परचुरेंच्या चाहत्यांपैकी एक या नात्याने मी…”, एकनाथ शिंदेंची चतुरस्त्र अभिनेत्याला श्रद्धांजली
Loksatta lokrang Documentary and Film Festival Director film
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले :  गोष्ट सांगण्यास उत्सुक…
Raj Thackeray Podcast video
Raj Thackeray Podcast: “महाराष्ट्राचं सोनं कधीच लुटलं, उरली फक्त…”, राज ठाकरेंचा हल्लाबोल
suhasini joshi
अभिनेत्री सुहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरवपदक
Narhari Zirwal Answer to Raj Thackeray
Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांचं राज ठाकरेंना उत्तर, “मी आदिवासी आहे जाळी नसली तरीही…”
What Raj Thackeray said?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी सुनावले खडे बोल, “देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतक्या खालच्या…”

‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत आवडत्या विनोदविराबद्दल विचारलं असता त्यांनी समीर चौघुलेचं नाव घेतलं. “खरं तर सर्वच कलाकार लाडके आहेत, पण एक नाव घ्यायचं असेल तर मी समीर चौघुलेचं घेईन. तो आमच्या शोचा लीड कलाकार आहे म्हणून नाही तर तो माणूस म्हणूनही खूप गोड आहे. हास्यजत्रेच्या पलीकडेही त्याचं व आमचं एक आपुलकीचं नातं आहे. त्याच्यात एक लहान मुल आहे,” असं ते म्हणाले.

हेही वाचा – Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कमाई केली? आकडेवारी आली समोर

पुढे त्यांनी समीर चौघुले कोणत्याच गोष्टीबद्दल तक्रार करत नाही, असंही नमूद केलं. “समीरचे कधीच नखरे नसतात, त्याच्या तक्रारी नसतात. त्याची प्रत्येक गोष्ट सर्वजण खूप गांभीर्याने घेतात. त्याचं झोकून देऊन काम करणं, चिडचिड न करणं या सगळ्या गोष्टींमुळे तो निरागस आहे. तो माणूस म्हणूनही खूप उत्तम आहे,” असं सचिन गोस्वामी म्हणाले.