प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी सोमवारी (२६ फेब्रुवारी ) शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थितीबाबत भाष्य केलं. “साईबाबा आणि देवी-देवतांनी मोदींची नेमणूक केली” असं ते म्हणाले. यावर आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी “पुढील ‘महाराष्ट्र भूषण’ (तुजं नमो गायक) सुरेश वाडकर…एक अंदाज.” अशी फेसबुक पोस्ट शेअर करत वाडकरांच्या त्या वक्तव्यावर टोला लगावला आहे. यावर आता नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा : ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त प्रशांत दामलेंची मोठी घोषणा! मराठमोळ्या ‘तिकिटालय’ ॲपचा शुभारंभ, जाणून घ्या…
नेमकं काय म्हणाले सुरेश वाडकर?
शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यावर माध्यमांशी संवाद साधताना सुरेश वाडकर म्हणाले होते, “मी गाणं वाजवणारा माणूस आहे. मला राजकारणातलं काही कळत नाही. पण साईबाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सर्वकाही चांगलं करणार. मला वाटतं देवी-देवतांनीच पंतप्रधान मोदींची नेमणूक केली आहे.”
दरम्यान, सुरेश वाडकरांना नुकताच ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना सुरेश वाडकर भावुक झाले होते.