‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या रिअॅलिटी शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी खूप लोकप्रिय आहेत. शोमधील कलाकार बऱ्याचदा त्यांच्या स्किटमध्ये सचिन गोस्वामी यांचं नाव घेत पंच मारत असतात. आपल्या शोमुळे विशेष ओळखल्या जाणाऱ्या सचिन गोस्वामी यांना दोन मुलं आहेत. त्यांनी एका मुलाखतीत त्यांची दोन्ही मुलं काय काम करतात, याबद्दल माहिती दिली आहे.
सचिन गोस्वामी यांच्या मोठ्या मुलाचं नाव पार्थेश गोस्वामी आहे. त्याने हास्यजत्रेमध्ये वडिलांना दोन वर्षे असिस्ट केलं होतं. नंतर तो ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेसाठी गेला. सध्या तो काही शॉर्ट फिल्म्स व इतर कामं करून एक्सप्लोर करत आहे. त्याने फिल्म्स अँड टेलिव्हिजनमध्ये मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलंय, असं सचिन गोस्वामी यांनी ‘इट्स मज्जा’शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा – सुंबूलचे वडील तौकीर खान दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले; अभिनेत्रीने शेअर केले खास Photos
सचिन गोस्वामी यांच्या धाकट्या मुलाने केटरिंगमध्ये कोर्स केला आहे आणि आता तो त्याचाच बिझनेस करत आहे. शुटिंगला जे केटरिंग सर्व्हिसेस पुरवतात, त्यामध्ये एक त्यांचा मुलगाही आहे. आरंभ केटरर्स नावाने त्याने बिझनेस सुरू केला आहे. तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी सर्व्हिस पुरवतो. ‘पोस्ट ऑफिस उघडे आहे’, यासाठीही त्याने सर्व्हिस पुरवली होती.
हेही वाचा –सई ताम्हणकर बॉयफ्रेंड अनिश जोगबरोबर फिरतेय स्पेन; ‘त्या’ एका फोटोने उलगडलं गुपित
मुलाच्या बिझनेसबद्दल अधिक माहिती देताना सचिन गोस्वामी म्हणाले, “शुटिंगचं जेवण खूप लोकांसाठी बनवावं लागतं. मुंबईत शुटिंगचं जेवण फक्त ३-४ जण पुरवतात. हजारो लोकांचं जेवण एकावेळी बनतं, त्यामुळे त्याची क्वालिटी चांगली नसते. परिणामी वारंवार केटरर्स बदलावे लागायचे. आमचं रोजचं काम आहे, महिन्यातून २०-२२ दिवस आम्हाला काम करावं लागतं. जेवण चांगलं नसेल तर अडचणी येतात. कारण सर्व नटांची प्रकृती सांभाळणंही गरजेचं असतं. त्यामुळे मुलाचा कोर्स संपल्यानंतर त्याच्या मित्राबरोबर त्याला हा केटरिंग व्यवसाय सुरू करायला लावला. मी दावा करून सांगतो की शुटिंगमधील सर्वात उत्तम जेवण आमच्याकडे मिळतं. माझा मुलगा ते पुरवतो म्हणून नाही तर तिथलं साहित्य सर्व आमच्या नजरेसमोर येतं,” असंही त्यांनी नमूद केलं.