दिवाळीनिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळीत वसूबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज हे पाचही दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मराठी कलाविश्वातील कलाकारांनी देखील दिपावलीनिमित्त खास तयारी केली आहे. काही कलाकार एकमेकांना भेटवस्तू पाठवून शुभेच्छा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या विशाखा सुभेदारला सुद्धा दोन खास व्यक्तींनी दिवाळीचं गिफ्ट पाठवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी; ‘फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्यासह करणार काम, म्हणाली, “एके दिवशी मी…”

अभिनेत्री विशाखा सुभेदारने ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांतून घराघरांत लोकप्रियता मिळवली. नाटक, मालिका, चित्रपट अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये विशाखाने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. हास्यजत्रेत तिच्या आणि समीर चौघुलेंच्या जोडीला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळत होता. परंतु, हास्यजत्रा लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अभिनेत्रीने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे या शोच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

आजही विशाखाचे अनेक चाहते तिला हास्यजत्रेत पुन्हा जाण्याची विनंती करतात. परंतु, अभिनेत्रीने अनेकदा यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. कोणत्याही वादामुळे नव्हे तर काहीतरी वेगळं करण्यासाठी तिने हा कार्यक्रम सोडला होता. विनोदी जॉनरपासून काही काळ ब्रेक हवा असल्याने तिने हा निर्णय घेतल्याचं हास्यजत्रेच्या दिग्दर्शकांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं दिग्दर्शन सचिन मोटे व सचिन गोस्वामी हे दोघे दिग्गज दिग्दर्शक करत आहेत. विशाखाने कार्यक्रम सोडल्यानंतरही दिवाळीनिमित्त या दोघांनी तिच्यासाठी खास भेटवस्तू पाठवली आहे. अभिनेत्रीने या भेटवस्तूचा फोटो शेअर करत दोन्ही दिग्दर्शकांचे आभार मानले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देणारं कार्ड आणि काही वस्तू पाहायला मिळत आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्रीने या दोन्ही दिग्दर्शकांना टॅग केलं आहे.

हेही वाचा : “मी १०० टक्के चुकलो”, ‘आदिपुरुष’च्या लेखकाची अखेर कबुली; म्हणाला, “या चित्रपटासाठी ६०० कोटी…”

विशाखा सुभेदार

दरम्यान, विशाखा सुभेदारच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती छोट्या पडद्यावरील ‘शुभविवाह हा झाला’ या मालिकेत रागिणी या खलनायिकेची भूमिका साकारत आहे. याशिवाय अभिनेत्री ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकात देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra directors sachin mote and sachin goswami send special diwali gift to vishakha subhedar sva 00