Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना आपली नवीन ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या या सगळ्या कलाकारांचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasya Jatra ) हा शो आजच्या घडीला घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सगळे कलाकार नुकतेच एकत्र जमले होते. आपल्या शूटिंगमधून वेळात वेळ काढून ही सगळी मंडळी बाहेर फिरायला जात असतात. हे सगळे कलाकार एकत्र आल्यावर धमाल व्हिडीओ बनवत असतात. सध्या सोशल मीडियावर ‘सैयां’ हे गाणं प्रचंड चर्चेत आहे. ‘सैयां’ गाण्याचा सुरुवातीचा आलाप अत्यंत कठीण आहे. त्यामुळे सध्या असंख्य नेटकरी यावर व्हिडीओ बनवत आहेत. हास्यजत्रेच्या कलाकारांनी सुद्धा या ट्रेंडिग गाण्यावर मजेशीर व्हिडीओ बनवला आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Maharashtrachi Hasya Jatra inside rehearsal video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे

हेही वाचा : योगिता चव्हाणला अश्रू अनावर; रितेशसमोर व्यक्त केली ‘बिग बॉस’ सोडण्याची इच्छा, पण…; नेमकं काय घडलं?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ

पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, निखिल बने, रोहित माने, वनिता खरात, नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट्ट, इशा डे, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर या सगळ्या कलाकारांनी मिळून ‘सैयां’ हे कठीण गाणं गाण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकजण सुरुवातीला एक-एक करून गाणं गाऊ गातो. परंतु, यांच्यापैकी मोजक्या काही जणांनाच गाणं गाता येतं. त्यामुळे या व्हिडीओमध्ये कोणाला आलाप घेता आला नाही, कोणाचे स्वरच जुळले नाही, काहीजण एक शब्द गायल्यावर हसु लागले अशा बऱ्याच मजेशीर घटना घडल्या आहेत.

हेही वाचा : भाऊच्या धक्क्यावर अक्षय कुमारची एन्ट्री! ‘झापुक झुपूक…’ म्हणत सूरजसह धरला ठेका, तर वर्षा उसगांवकरांना म्हणाला…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या ( Maharashtrachi Hasya Jatra ) कलाकारांनी शेअर केलेल्या व्हिडीओला पृथ्वीक प्रतापने “तुम्ही तुमच्या रिस्कवर बघा”, तर निखिल बनेने “न हसता व्हिडीओ बघा” असं कॅप्शन दिलं आहे. परंतु, या कलाकारांपैकी बहुतेकांचे आवाज सुमधूर नाहीत त्यामुळे सर्वजण मिळून एकमेकांवर खळखळून हसत आहेत. म्हणूनच “व्हिडीओ न हसता बघा” असं या कलाकारांकडून सांगण्यात आलं आहे.

Maharashtrachi Hasya Jatra
नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस ( Maharashtrachi Hasya Jatra )

नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून अन् कॅप्शन वाचून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हसल्याशिवाय राहणार नाही”, “हास्यजत्रा म्हणजे टॉपचा विषय”, “तुम्ही सगळे एकत्र असल्यावर हसायला येणारच ना”, “न हसता तुमचा व्हिडीओ बघणं म्हणजे अशक्य आहे” दरम्यान, काही तासांतच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Story img Loader