अभिनेत्री नम्रता संभेरावला आता महाराष्ट्रातील घराघरांत हास्यजत्रेची लॉली म्हणून ओळखलं जातं. नम्रताने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लवकरच ती ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सध्या नम्रता या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रत्येक कलाकाराला शूटिंगमधून वेळ काढून कुटुंबाच्या जवळ राहणं खूप महत्त्वाचं असतं. खऱ्या आयुष्यात अभिनेत्री एक पत्नी, आई, मैत्रीण अशा सगळ्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळते. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून नम्रता आपल्या कामाशी एकनिष्ठ असल्याने प्रेक्षक तिचं विशेष कौतुक करतात.

हेही वाचा : ठरलं तर मग : सायलीच्या गरोदरपणावर डॉक्टरांनी केलं शिक्कामोर्तब! सासूबाई आनंदी, तर सायली-अर्जुन चिंतेत; पाहा नवीन प्रोमो…

shivani rangole mother started new venture
मास्तरीण बाईंनी दिली आनंदाची बातमी! शिवानी रांगोळेच्या आईने सुरू केला ‘हा’ नवीन उपक्रम; म्हणाली, “लहानपणी मला…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

अभिनेत्री नम्रता संभेरावच्या लेकाचं नाव रुद्राज असं आहे. शूटिंगच्या शेड्यूलमधून अनेकदा तिला लेकाला पुरेसा वेळ देता येत नाही. अशावेळी अभिनेत्रीच्या मनात सतत रुद्राजला भेटण्याची ओढ लागलेली असते. रुद्राजदेखील आईची तेवढीच आठवण काढत असतो. यामुळेच अभिनेत्रीने लाडक्या लेकाचं कौतुक करत एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये नम्रताने रुद्राजने बनवलेल्या नव्या नियमाविषयी सुद्धा सांगितलं आहे.

हेही वाचा : “ए़वढी वर्ष काम करून इंडस्ट्रीत फक्त एकच मैत्रीण”, अमृता खानविलकरने केलं स्पष्ट भाष्य, म्हणाली…

लेकाबरोबरचा गोड फोटो शेअर करत नम्रता संभेराव लिहिते, “तुझ्या चेहऱ्यावरचं हे गोड हसू पाहिलं की माझं आयुष्य वाढतं कारण मी घरी आल्यावर पळत येऊन दार उघडायचं आणि घरात पाऊल ठेवायच्या आधी घट्ट मिठी मारायची हा आता त्याने त्याचा बनवलेला नियम आहे. त्यामुळे घरी जाण्याची ओढ लागते कधी एकदा तो हसरा चेहरा ती गोड मिठी अनुभवतेय असं होतं. आई तू माझी favorite आहेस, तू माझी आई आहेस असं तुझ्या नाजूक आवाजात ऐकलं की आई झाल्याचा अभिमान गर्व वाटतो. I love you so much रुद्राज!”

हेही वाचा : “पाटील साहेबांना काही झालं तर सरकारने…”, मराठी अभिनेत्रीची मनोज जरांगेंच्या उपोषणासंदर्भात पोस्ट; म्हणाली, “आता आमच्यावर…”

आई घरी आल्यावर दार उघडून तिला घट्ट मिठी मारायची हा नियम रुद्राजने त्याच्या लाडक्या आईसाठी बनवल्याचं या पोस्टद्वारे नम्रता संभेरावने सांगितलं आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, नम्रता संभेराव प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader