Priyadarshini Indalkar : प्रत्येकाच्या आयुष्यात बालपणाचा काळ फार सुखद आणि आनंदाचा असतो. बालपण आपल्याला पूर्णत: आठवत नसले तरी फोटो पाहून तेव्हाच्या आठवणी जाग्या होतात. लहान मुले म्हणजे कोरी पाटी आणि निरागस स्वभाव. त्यामुळे लहान मुले प्रत्येकाला आवडतात. आज १४ नोव्हेंबर म्हणजे बाल दिन असल्यामुळे आज प्रत्येक जण आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आहे. अशात सिनेविश्वातील एका सुंदर अभिनेत्रीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो नेमका कुणाचा आहे? असा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल. ही अभिनेत्री सध्या संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. या हिंटनेसुद्धा तुम्ही ही कलाकार कोण आहे ते ओळखले नसेल, तर आम्ही तुम्हाला तिची ओळख सांगणार आहोत. फोटोत दिसत असलेली गोड चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर आहे.
हेही वाचा : जुही चावला बॉलीवूडमधील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री! चित्रपटांपासून दूर असूनही कसे कमावते पैसे? उत्पन्नाचा स्रोत काय? घ्या जाणून…

आज बाल दिन आसल्याने प्रियदर्शिनीने तिचा शाळेतील फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “१९९७ पासून शहाणी मुलगी. बालदिनाच्या शुभेच्छा.” या फोटोत प्रियदर्शिनीने शाळेतील गणवेश परिधान केला आहे. पांढरा शर्ट, निळे फ्रॉक, पांढरे मोजे आणि काळे बुट तसेच कमरेला पट्टा, असा संपूर्ण गणवेश परिधान करून तिने यावर स्वत:चे आयडीकार्ड सुद्धा लावले आहे. डोक्याला एक छोटा स्कार्फ बांधून शाळेतील दप्तरासह तिने फोटो काढला आहे.

प्रियदर्शिनीचा लहानपणीचा फोटो पाहून चाहते सुद्धा चकित झालेत. प्रत्येक जण कमेंटमध्ये या फोटोचे कौतुक करीत आहेत. तसेच हार्ट इमोजी सुद्धा शेअर करीत आहेत. एका नेटकऱ्याने अभिनेत्रीच्या स्माइलकडे लक्ष दिले आणि कमेंटमध्ये लिहिले, “डिंपल तेव्हापासूनच दिसत आहेत.”

प्रियदर्शिनी सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये काम करते. या आधी तिने ‘फुलराणी’ आणि ‘सोयरीक’मध्ये काम केले आहे. प्रियदर्शिनीने ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये आजवर गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप आणि ओंकार भोजने यांच्याबरोबर काम केले आहे. प्रियदर्शिनीने आपल्या परफेक्ट कॉमेडीने आजवर सर्वांना अगदी पोट दुखेपर्यंत हसवले आहे.

हेही वाचा : ‘प्रेमाची गोष्ट’मधून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट! आता हर्षवर्धनच्या भूमिकेत झळकणार ‘हा’ कलाकार, मालिकेत आहे मोठा ट्विस्ट

विषामृत नाटकाची सर्वत्र चर्चा
प्रियदर्शिनी छोट्या पडद्यासह नाटकांमध्ये देखील काम करते. सध्य तिच्या विषामृत नाटकाची सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. ९ नोव्हेंबरपासून या नाटकाचे प्रयोग सुरू झाले आहेत. घन:श्याम रहाळकर लिखित या नाटकाचे विजय केंकरे यांनी दिग्दर्शन केले आहे. या नाटकात प्रियदर्शिनी अमृता हे पात्र साकारत आहे. प्रेक्षकांकडून प्रियदर्शिनीच्या या नाटकाला सुद्धा मोठी पसंती मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame actress priyadarshini indalkar shared her childhood photo on social media childrens day rsj