‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात या कार्यक्रमाचे चाहते आहेत. हा मराठी कॉमेडी शो सर्वत्र लोकप्रिय आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. घराघरांत या कलाकारांचा चाहतावर्ग निर्माण झाला. वनिता खरात, ओंकार राऊत, मंदार मांडवकर, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, रोहित माने, रसिका वेंगुर्लेकर, निखिल हे कलाकार सर्वत्र लोकप्रिय झाले.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील सगळेच कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर आजवर इथवर आले आहेत. सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनत करून त्यांनी यशाचा एवढा मोठा टप्पा गाठला आहे. ही सगळीच मंडळी आपल्या शेड्यूलमध्ये व्यग्र असतात. परंतु, नुकतेच हे कलाकार वेळात वेळ काढून अलिबाग फिरायला गेले होते. या अलिबाग ट्रिपचा खास व्हिडीओ अभिनेत्री वनिता खरातच्या नवऱ्याने त्यांच्या ‘सुमीतवनी’ या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : मराठमोळ्या श्रेयस तळपदेची कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये वर्णी! पहिली झलक शेअर करत म्हणाला, “बायोपिकमध्ये…”

वनिता खरातचा पती सुमीत लोंढेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रसिका वेंगुर्लेकर व तिचा पती, ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर, मंदार मांडवकर, रोहित माने व त्याती पत्नी आणि स्वत: वनिता खरात यांची झलक पाहायला मिळत आहे. या सगळ्यांनी अलिबागमध्ये एकत्र भरपूर धमाल केली. स्विमिंग पूलमध्ये मजा करून त्यानंतर या कलाकारांनी एकत्र बसून मांसाहारी जेवणावर ताव मारल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

गेल्यावर्षी हे सगळे कलाकार मिळून प्रियदर्शिनीच्या फार्महाऊसवर गेले होते. यंदा या कलाकारांनी अलिबागमध्ये धमाल केली आहे. आपले लाडके कलाकार दैनंदिन आयुष्यात काय करतात याची उत्सुकता सगळ्याच प्रेक्षकांना असते. त्यामुळे या कलाकारांच्या अलिबाग ट्रिप व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “एक गोष्ट मी अजूनही…”, तीन वर्षांनंतर मंदिरा बेदीने पतीच्या निधनाबद्दल सोडलं मौन; हार्ट अटॅकने झाला राज कौशलचा मृत्यू

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर, या कार्यक्रमाचे जगभरात विविध ठिकाणी शोज होत असतात. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, दुबई, अमेरिका अशा विविध ठिकाणी गेल्या वर्षभरात हास्यजत्रेच्या टीमने दौरे केले होते. या सगळ्या प्रयोगांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर या कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर, अभिनेत्री प्राजक्ता माळी सूत्रसंचालकाची भूमिका निभावत आहे.

Story img Loader