अभिनेते अरुण कदम यांनी मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या विनोदी शैलीनं वेगळी छाप उमटवली आहे. लाडका दादूस म्हणून त्यांना ओळखलं जातं. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी अरुण कदम आजोबा झाले. त्यांची लेक सुकन्याने १९ ऑगस्टला एका गोंडस मुलाला जन्म दिला. सप्टेंबर महिन्यात त्याचा थाटामाटात नामकरण सोहळा पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. यंदा अरुण कदम यांच्या नातवाची पहिली दिवाळी आहे. त्यामुळे अभिनेते आपल्या नातवाबरोबर ही दिवाळी साजरी करताना दिसत आहेत.

हेही वाचा – दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदेशाहीचं उद्योग जगतात पदार्पण; पंढरपुरात सुरू केलं पहिलं…

अरुण कदम यांच्या नातवाचं नाव अथांग आहे. त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर त्याच्या पहिल्या दिवाळीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अथांगला अरुण कदम आणि त्यांची पत्नी उटणे लावताना दिसत आहेत. त्यानंतर अथांगचं औक्षण करून अभिनेत्याची पत्नी खास भेटवस्तू देताना पाहायला मिळत आहेत. याशिवाय नातवाची पहिली दिवाळी असल्यानिमित्ताने अरुण कदम यांनी कुटुंबीयांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याचं दिसत आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अनघा अतुलने २०२०मध्ये सुरू केलं होतं पहिलं हॉटेल; ‘या’ कारणामुळे वर्षभरातच करावं लागलं बंद

हेही वाचा – दिवाळी पार्टीसाठी जान्हवी कपूरचा खास ग्लॅमरस लूक; रॉयल ब्ल्यू रंगाच्या साडीने वेधलं लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क

अथांगच्या पहिल्या दिवाळीच्या या व्हिडीओवर अरुण कदम यांच्या चाहत्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “किती गोड”, “बाळ आजोबांसारखं आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader