‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीराने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हास्यजत्रेमुळे अनेक नवनवीन कलाकार प्रसिद्धीझोतात आले. यापैकीच एक लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेत्री चेतना भट. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्रीने नुकतीच एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री चेतना भटने आलिशान गाडी खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. यासंदर्भात इन्स्टग्रामवर पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली आहे. स्वत:चं हक्काचं घर आणि गाडी घ्यायची हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर, गाड्या घेऊन आपली स्वप्नपूर्ती केली आहे. आता यामध्ये चेतनाचं नाव जोडलं गेलं आहे.
हेही वाचा : मोहन जोशींना यंदाचा ‘झी जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान! म्हणाले, “आताच्या नव्या पिढीने…”
चेतना भटने नुकतेच नव्या गाडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “आज एक स्वप्न पूर्ण झालं…गाडी घेतली टाटा पंच” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. शिवाली परब, प्रिया मराठे, प्रियदर्शनी इंदलकर, नम्रता संभेराव, निखिल बने, पृथ्वीक प्रताप, प्राजक्ता माळी, ऋतुजा बागवे, अमित फाळके अशा सगळ्या कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : २० वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या? आदेश बांदेकर म्हणाले, “सुचित्राबरोबर लग्न केलं तेव्हा…”
दरम्यान, चेतना भटने TATA PUNCH ही गाडी खरेदी केली आहे. सध्या बाजारात या गाडीची किंमत Financial Express ने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास कमीत कमी ५.४९ लाख (एक्सशोरुम) एवढी आहे.