‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांना प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे. दत्तूने नुकताच त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. दत्तू मोरे हा विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नातील फोटोंची चर्चा पाहायला मिळत आहे. त्याबरोबर त्याची पत्नी नक्की काय करते, याबद्दलही चर्चा रंगली आहे.
दत्तूने अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली. दत्तूची पत्नी नेमकी कोण आहे, याची चर्चाही पाहायला मिळत आहे. नुकतंच तिच्याबद्दलची माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा : “नवा सोबती…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने लग्नाचा पहिला फोटो केला शेअर
दत्तूच्या पत्नीचं नाव स्वाती घुनागे असं आहे. स्वाती ही व्यवसायाने डॉक्टर आहे. ती स्त्रीरोग तज्ञ असून तिचं पुण्यात स्वत:चं क्लनिक आहे. स्वाती अनेक सामाजिक कार्यात सक्रीय असते.
दरम्यान दत्तूने मंगळवारी २३ मे २०२३ रोजी कोर्ट मॅरेज करत लग्नगाठ बांधली. दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं. त्याच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
आणखी वाचा : “नक्की काय दाखवायचं आहे…” नव्या फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “मराठी इंडस्ट्रीमध्ये…”
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने उरकलं गुपचूप लग्न, पाहा फोटो
दत्तूने सुरुवातीला त्याच्या प्री-वेडींगचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यात त्याने जस्ट मॅरिड असं कॅप्शन दिले होते. त्यानंतर दत्तूने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले. यावेळी दत्तूची पत्नीने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर दत्तूने धोती-कुर्ता असा पेहराव केला होता.