छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी लाफ्टर थेरपीच बनला आहे. करोना काळातही या कार्यक्रमाने प्रेक्षकांच चांगलच मनोरंजन केलं होतं. पण सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम ब्रेकवर आहे. पण या क्रार्यक्रमातील कलाकार मात्र प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रेचे कलाकार सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथल्या मराठी प्रेक्षकांच हे कलाकार मनोरंजन करत आहेत. दरम्यान गौरव मोरे आणि वनिता खरात यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गौरव आणि वनिता अमेरिकेच्या रस्त्यावर बडे मिया छोटे मिया चित्रपटातील गाण्यावर नाचतना दिसत आहेत. त्यांचा हा भन्नाट डान्स प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.
काही दिवसांपूर्वी गौरव मोरेने अमेरिकेच्या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या कार्यक्रमाला अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. गौरवने हा व्हिडीओ पोस्ट करत तिथल्या प्रेक्षकांचे आभार मानले होते.
हेही वाचा- ‘लोकमान्य’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, स्पृहा जोशीची भावूक पोस्ट; म्हणाली “अमर्याद एकटेपण…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम सध्या ब्रेकवर आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु करण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. आता प्रेक्षकांच्या या आग्रहानंतर हा कार्यक्रम पुन्हा कधी सुरु होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.