‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे प्रचंड लोकप्रिय झाला. आज त्याला महाराष्ट्रातील घराघरांत फिल्टरपाड्याचा बच्चन ही नवीन ओळख मिळाली आहे. हास्यजत्रेमुळे गौरवसारखे अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. महाराष्ट्राला खळखळून हसवणारा हा विनोदवीर सध्या कामानिमित्त गोव्यात पोहोचला आहे.

गौरव मोरे गेले काही दिवस चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त कोकण दौऱ्यावर होता. परंतु, आता हा प्रेक्षकांचा लाडका विनोदवीर गोव्यात पोहोचला आहे. अभिनेत्याने गोव्यातील एका किल्ल्यावरून खास व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : Video : भर कार्यक्रमात शाहरुख खानच्या पाया पडला अन्…; ‘जवान’ फेम अ‍ॅटलीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष; सर्वत्र होतंय कौतुक

गौरव मोरेने त्याच्या दोन मित्रांसह गोव्यातील एका किल्ल्यावर आमिर खानच्या ‘दिल चाहता है’ चित्रपटातील आयकॉनिक सीन रिक्रिएट केला आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल चाहता है’मध्ये आमिरसह सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील गोव्यातील चापोरा फोर्टवरचा आयकॉनिक सीन प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. याच सीनचा ऑडिओ जोडून गौरव मोरेने खास व्हिडीओ शेअर केला आहे. चित्रपटात चापोरा किल्ल्यावर बसून समुद्र पाहताना आमिर त्याच्या मित्रांना “आपण प्रत्येक वर्षी कमीत कमी एकदा तरी गोव्याला आलं पाहिजे” असं सांगत असतो.

हेही वाचा : Oscar च्या १.४ कोटींच्या ‘गुडी बॅग’ मध्ये नेमकं काय असतं? कोणाला मिळतात या बॅग्स? जाणून घ्या सर्व माहिती

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरवने या व्हिडीओमध्ये ‘आय लव्ह गोवा’ हे टी-शर्ट परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्याच्या मागे निळाशार समुद्र पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात ‘दिल चाहता है’ चित्रपटात सुद्धा अशाचप्रकारे या सीनचं शूटिंग करण्यात आलं आहे. त्यामुळे गौरवच्या या व्हिडीओवर ‘दिल चाहता है’ चित्रपटाच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तब्बल २३ वर्षांपूर्वीच्या आठवणी अभिनेत्यामुळे पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. दरम्यान, गौरव मोरेचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांतच या व्हिडीओला ९० हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.