‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आजच्या घडीला जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय झाला. काही दिवसांपूर्वीच या फिल्टर पाड्याच्या बच्चनने हास्यजत्रेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु, असं जरी असलं तरीही या कार्यक्रमाशी माझं कायम घट्ट नातं राहणार असं गौरवने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. याशिवाय अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरव मोरे पहिल्यापासूनच बॉलीवूड चित्रपटांचा खूप मोठा चाहता आहे. अभिनेत्याने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर एका जुन्या चित्रपटासाठी खास पोस्ट लिहिली आहे. गौरवचा आवडचा चित्रपट जवळपास २६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट नेमका कोणता आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : ‘वेड’ फेम शुभंकर सोशल मीडिया स्टारच्या प्रेमात, ‘त्या’ फोटोवर मराठी कलाकारांसह अभिनेत्याच्या वडिलांची कमेंट, म्हणाले…

अभिनेता गौरव मोरेने रामगोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ चित्रपटासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटात अभिनेते मनोज बाजपेयी प्रमुख भूमिकेत झळकले होते. हा चित्रपट सगळ्यात आवडता असल्याचं गौरवने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

अभिनेता गौरव मोरेची पोस्ट

दम हैं, दम हैं, इसमें… भिकू नाम हैं मेरा, भिकू बोला ना…..
‘सत्या’
माझी सगळ्यात आवडती फिल्म.
भिकू म्हात्रे आणि ‘सत्या’ यांची मैत्री…

२६ वर्षे झाली, पण हा सिनेमा आजही तितकाच ताजा आहे. एक एक फ्रेम, गाणी, पात्र सगळंच भारी आहे. या सिनेमातला पाऊस सुद्धा भारी आहे आणि याचं बॅकग्राउंड म्यूजिक क्या बात है भाई. मुंबई इतक्या सुंदररित्या सिनेमामध्ये मी आजपर्यंत पाहिली नाही. मी फक्त एक सांगेन बाहेर मस्त पाऊस सुरू झाला की, ‘सत्या’ नक्की बघा… पाऊस आणि सत्या एक वेगळंच समीकरण आहे.

मुंबई का किंग कौन? भिकू म्हात्रे…

अरे मामू अपना भिकू हैं वो… भिकू तू अपुन का धंदा नहीं जानता एक गया अपूने के धंदे में तो सब जाएगा ।
असे अनेक डायलॉग आहेत जे आपण कधीच विसरू शकत नाही… निदान मी तरी
Thank You Very Much

हेही वाचा : फिल्मी करिअर फ्लॉप पण लक्झरी आयुष्य जगतो सुझान खानचा भाऊ, जायेद खानच्या संपत्तीचा आकडा वाचून चकित व्हाल

दरम्यान, गौरव मोरेच्या पोस्टच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यावर त्याने हिंदी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये एन्ट्री घेतली. मराठीप्रमाणे हिंदी प्रेक्षकांना सुद्धा गौरवच्या अभिनयाची भुरळ पडली आहे. याशिवाय गौरव अलीकडेच ‘अल्याड-पल्याड’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगल यश मिळवलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame gaurav more write special post for satya movie sva 00