‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेले अभिनेते अरुण कदम म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके दादूस यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. अरुण कदम यांचे सगळे फोटो या हॅकरने डिलीट करून दादूसच्या अकाऊंटवरून स्वत:चे वेगळे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेते अरुण कदम यांनी मराठी मनोरंजनसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. प्रेक्षक त्यांना लाडका दादूस या नावाने ओळखतात. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. अलीकडच्या काळात अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर संपर्कात राहतात. आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव ते फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. परंतु, बऱ्याचदा कलाकारांना सोशल मीडिया हॅकिंगचा सामना करावा लागतो.
अरुण कदम काही महिन्यांपूर्वी आजोबा झाले होते. त्यांच्या नातवाचे फोटो आणि त्याच्या नामकरण सोहळ्यातील काही क्षण त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. परंतु, हे सगळे फोटो डिलीट करून हॅकरने त्यांच्या अकाऊंटचा संपूर्णपणे ताबा मिळवला आहे. तसेच या ब्लू टिक असलेल्या अकाऊंटवर स्वत:चे फोटो शेअर केले आहेत. अरुण कदम यांनी अद्याप याबाबत कोणंतही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
दरम्यान, अरुण कदम यांच्याप्रमाणे याआधी मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना हॅकिंगचा सामना करावा लागला होता. अमृता धोंगडे, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेत्री क्षिती जोग यांचं फेसबुक-इन्स्टाग्राम अकाऊंट देखील अशाचप्रकारे हॅक करण्यात आलं होतं.