प्रसाद खांडेकरने दिग्दर्शित केलेल्या ‘कुर्रर्रर्र’ या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये प्रसादसह विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. परंतु, आता या नाटकातून प्रसाद आणि नम्रताने एक्झिट घेतल्याची माहिती विशाखाने एक पोस्ट शेअर करत सर्वांना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसाद नम्रताच्या जागी आता ‘कुर्रर्रर्र’ या नाटकात प्रेक्षकांना प्रियदर्शन जाधव आणि मयुरा रानडे हे दोन नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे सध्या नम्रता आणि प्रसादची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली आहे. या दोघांनी नाटकातून अचानक एक्झिट घेतल्याने प्रेक्षकांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण पसरलं आहे.

हेही वाचा : Video : “शाळेचा वर्ग, मैदान अन्…”, सिद्धार्थ चांदेकर रमला जुन्या आठवणीत! म्हणाला, “अडीच रुपयांचा वडापाव…”

विशाखाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी नम्रता-प्रसादने नाटक का सोडलं? अशा प्रश्नांचा भडीमार केला आहे. त्यांच्या एका चाहतीने मज्जाचं गेली…नमा आणि प्रसादची जोडी, त्यांची मसालेदार केमिस्ट्री या नाटकाचं मुख्य आकर्षण होती अशी कमेंट केली होती. यावर विशाखाने “या बघायला आधीचे नका ठरवू…तुम्हाला नक्की वेगळेपण जाणवेल. मसाले वेगळे वापरले तरीही चव चांगली लागू शकते…एकदा येऊन तर बघा” असं उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : अर्जुन ‘असे’ मानणार सायलीचे आभार! ‘ठरलं तर मग’ मालिकेचा नवीन प्रोमो आला समोर…

‘कुर्रर्रर्र’ या नाटकाच्या आणखी एका चाहत्याने विशाखाच्या पोस्टवर कमेंट केली होती. यामध्ये त्याने “नमूची जागा कोणीही नाही घेऊ शकत…जशी तुमची महाराष्ट्राची हास्यजत्रामधली जागा” असं म्हटलं होतं. यावर खरंय…पण, शो जागेवर बसण्यापेक्षा हे बरं नाही का? असं उत्तर विशाखाने या नेटकऱ्याला दिलं आहे.

विशाखा सुभेदार

दरम्यान, या कलाकरांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर हे तिघेही ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame namrata sambherao and prasad khandekar exit from kurrr drama vishaka subhedar reacted to netizen questions sva 00
Show comments