हास्यजत्रेमधील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव लवकरच एका नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हास्यजत्रेमुळे नम्रताला सर्वत्र ‘लॉली’, ‘नमा ताई’ अशी वेगळी ओळख मिळाली. अभिनयाबरोबरच नम्रता संभेराव तिच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखली जाते. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने नम्रताने अलीकडेच ‘मीडिया टॉल्क मराठी’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिने वैयक्तिक जीवनाबाबत अनेक खुलासे केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ठरलं तर मग : प्रिया आणि अस्मिताचं भांडं फुटणार! अर्जुनसमोर ‘असं’ उघड होणार सत्य, पाहा नवीन प्रोमो…

नम्रता संभेरावला तिच्यात असलेल्या छुप्या टॅलेंटविषयी विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, “मला सगळ्याच गोष्टी थोड्याफार करता येतात. मला अभिनयाशिवाय थोडफार गाणं गाता येतं, नाचता येतं या गोष्टी आता सगळ्यांनाच माहीत झाल्या आहेत. पण, माझ्यातील छुप्या (Hidden) टॅलेंटबद्दल सांगायचं झालं, तर मी उत्तम स्वयंपाक करते.”

हेही वाचा : रेव्ह पार्ट्या, सापाचे विष अन् परदेशी तरुणी…, सर्व आरोपांवर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

“मला स्वयंपाक करायला प्रचंड आवडतं. मला खूप छान पावभाजी बनवता येते. आपल्या घरचं साध जेवण वरण-भात, मेथीची भाजी, बाजरीच्या भाकऱ्या, लसणाची आणि शेंगदाण्याची चटणी असा पारंपरिक स्वयंपाक मला उत्तम बनवता येतो. माझ्या या टॅलेंटबद्दल फारसं कोणाला माहीत नाही त्यामुळे माझ्या हातच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर एकदा येऊन तर बघा.” असा सल्ला नम्रता संभेरावने तिच्या चाहत्यांना दिला आहे.

हेही वाचा : ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचे शूटींग पूर्ण, प्रसाद ओक पोस्ट करत म्हणाला “आज अखेर…”

दरम्यान, नम्रताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘एकदा येऊन तर बघा’ या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित चित्रपटात अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame namrata sambherao reveals about her hidden talent says she loves to cook sva 00