‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. नम्रता संभेरावला सुद्धा या कार्यक्रमामुळे एक वेगळी ओळख मिळाली. नुकतीच अभिनेत्रीने ‘श्रावणमेळा’ या मंगळागौरीच्या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव नम्रताने तिच्या लग्नातील खास उखाणा घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “तरुणपणी खूप उद्दाम होतं, म्हातारं झालं आणि लाचार…”, गश्मीर महाजनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हास्यजत्रेतील अनेक अभिनेत्रींनी यंदा मंगळागौरीच्या कार्यक्रमांना विशेष उपस्थिती लावली होती. यामध्ये नम्रता संभेरावने घेतलेला हटके उखाणा ऐकून सगळेच थक्क झाले होते. याशिवाय नम्रता काही महिलांबरोबर मंगळागौरीचे खेळ खेळली, फुगड्या घातल्या अशाप्रकारे प्रेक्षकांमध्ये सहभागी होऊन तिने सर्व स्पर्धकांचा उत्साह वाढवला. यावेळी तिचे पती योगेश संभेराव सुद्धा उपस्थित होते.

हेही वाचा : “पंजाबी लोकांना रात्री…”, विकी-कतरिनाच्या लग्नातील जेवणाचा मेन्यू कोणी ठरवला होता? अभिनेत्याने केला खुलासा

नम्रता उखाणा घेत म्हणाली, “झाड झुंबराचं, फुल उंबराचं, दूध गाईचं, फुल जाईचं, लेक कुणाची आई वडिलांची, सून कुणाची सासू सासऱ्यांची, राणी कुणाची भरताराची, भरतार भरतार केलं नाही, कधी रुसवा घेतला नाही, रूसवा घेऊ कशासाठी, नेसायला दिली पिवळी धाटी, पिवळ्या धाटीला उभा दोरा, रुखवत गेला पाटलांच्या घरा, पाटील म्हणतो नाव घे बाई, नाव काय फुकाचं, हळदी कुकाचं, हळदी कुकानं भरलं ताट… योगेशराव बसले पूजेला समया लावते तीनशे साठ!”

हेही वाचा : “…तर तुम्ही भिकेला लागाल”; ‘श्वास’ फेम अभिनेते अरुण नलावडे यांना असं कोण म्हणालं होतं?

नम्रताने हा उखाणा तिच्या लग्नात घेतला होता. तेव्हापासून हा हटके उखाणा अभिनेत्रीच्या तोंडपाठ आहे. दरम्यान, अभिनेत्री नम्रता संभेराव कायमचं तिच्या अभिनयाने आणि विनोदीशैलीने प्रेक्षकांना आपलंसं करते. सध्या ती हास्यजत्रेच्या नव्या पर्वाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame namrata sambherao special ukhana at mangalagaur function in thane sva 00