Maharashtrachi Hasya Jatra Fame Nikhil Bane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय आहे. याचा चाहतावर्ग जगभरात पसरलेला आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. यापैकी एक म्हणजेच निखिल बने. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली अनेक वर्षे निखिल रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. हास्यजत्रेशिवाय तो चित्रपटामध्येही देखील झळकला आहे. याशिवाय त्याचे डेली व्लॉग्स सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निखिल चिपळूणचा असल्याने तो वरचेवर कोकणात जात असतो. अनेकदा त्याच्या व्हिडीओमध्ये गावची झलक, कोकणातील त्याचं टुमदार घर, गावची संस्कृती, भजनाची परंपरा या सगळ्याची झलक पाहायला मिळते. विशेषत: गणेशोत्सवात आणि शिमग्याच्या सणाला चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणाची वाट धरतात. या दोन सणांना कोकणात सर्वाधिक महत्त्व आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘जंगलराज’मध्ये घरातील ५ सदस्य झाले नॉमिनेट! जान्हवीला अश्रू अनावर, तर निक्कीने…; नेमकं काय घडलं?

निखिलने दाखवली गावच्या गणेशोत्सवाची झलक

गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर आधी कोकणातील घराघरांत तयारी सुरू होते. बाप्पाचं स्वागत, नैवेद्य, यादरम्यान येणारे सणवार, गौराईचं आगमन आणि शेवटी गौरी-गणपती विसर्जन होईपर्यंत कोकणातील घराघरांत लगबग चालू असते. बाप्पाच्या विसर्जनाची खास झलक निखिलने आपल्या व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. गावी एकत्र आरती करून, देवाला गाऱ्हाणं घालून, एकत्र प्रसादाचं वाटप करून बाप्पाचं नदीवर विसर्जन केलं जातं असं निखिलच्या ( Nikhil Bane ) व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

अभिनेत्याने या व्हिडीओला “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी” हे गाणं जोडलं आहे. गौरी-गणपती निरोप घेताना अनेक जण भावुक होतात. निखिलच्या व्हिडीओवर देखील नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत कमेंट सेक्शनमध्ये भावुक झाल्याचे इमोजी जोडले आहेत. तर, ज्या लोकांना यावर्षी गणपतीत गावी जाता आलं नाही…त्यांनी हा सुंदर व्हिडीओ शेअर केल्याबद्दल निखिलचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : ठरलं तर मग : सायलीच खरी तन्वी! अर्जुनने पाहिली बायकोच्या पायावरची जन्मखूण; प्रियाचा खोटेपणा उघड होणार, पाहा प्रोमो

निखिल बनेने दाखवली बाप्पाच्या विसर्जनाची खास झलक ( फोटो सौजन्य : Nikhil Bane )

दरम्यान, निखिल बनेच्या ( Nikhil Bane ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. याशिवाय गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘Boyz 4’ चित्रपटात तो झळकला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame nikhil bane shared beautiful video of kokan ganpati bappa visarjan sva 00