‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार नेहमी चर्चेत असतात. या कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या कार्यक्रमामुळे बऱ्याच नवोदित कलाकारांना नवी ओळख मिळाली असून ते रुपेरी पडद्यावर देखील पाहायला मिळत आहे. यापैकीच एक म्हणजे बने अर्थात निखिल बने.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून नावारुपाला आलेल्या निखिलने ‘बॉईज ४’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील त्याच्या कामाचं चांगलंच कौतुक झालं होतं. अशा या लाडक्या बनेने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामधून त्याने भांडूप ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटपर्यंतचा प्रवास दाखवला.
हेही वाचा – “हे राम, वाचव आमचे कान…”, अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले…
“चला जाऊ शुटिंगला”, असं कॅप्शन लिहित निखिल बनेने व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत, सकाळी उठून घरी चहा-फरसाण खाण्यापासून ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील रिहर्सल आणि पुन्हा घरी असा एकूण दिवसभराचा प्रवास निखिलने दाखवला आहे. निखिलचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – Video: मृण्मयी देशपांडेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून गौतमी देशपांडे झाली नाराज, नेमकं काय घडलंय? पाहा…
निखिलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “बने दोस्त तुला खूप खूप यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, “चहा फरसाण…शास्त्र असतं ते”, “एकदम कडक”, “तुझं आयुष्य खूप छान आहे. तू नशीबवान आहेस”, अशा अनेक प्रतिक्रिया बनेच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.