गणपती उत्सव, शिमगा आणि उन्हाळ्याच्या लागोपाठ सुट्ट्या आल्या की, चाकरमानीवर्ग गावची वाट धरतो. अलीकडच्या काळात कोकणातील निसर्ग सौंदर्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. मराठी मनोरंजन विश्वातील बहुतांश कलाकार हे कोकणातले आहेत. त्यामुळे शूटिंगमधून वेळात वेळ काढून हे सगळे कलाकार आवर्जून कोकणात आपल्या मूळ गावी जातात. सणासुदीला आणि सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. सध्या असाच एक अभिनेता आपल्या गावच्या घरी गेला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे बरेच मराठी कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेता निखिल बने सुद्धा हास्यजत्रेमुळे घराघरांत लोकप्रिय झाला. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तो नुकताच आपल्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढत कोकणात गेला होता.
निखिलने गावच्या घराचा सुंदर असा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कोकण प्लस कोरा चहा असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोला दिलं होतं. याशिवाय त्याने सोशल मीडियावरील एका ट्रेडिंग गाण्यावर खास व्हिडीओ शेअर केला आहे.
वन लव्ह हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच ट्रेन्ड होत आहे. याच गाण्यावर व्हिडीओ शेअर करत निखिलने वन लव्हची उपमा कोकणातील घर, आंबा, काजू, फणस यांना दिली आहे. या व्हिडीओला त्याने “कोकणचो One love” असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, निखिलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सध्या तो हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच तो ‘बॉईज ४’ चित्रपटात झळकला होता.