‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. हास्यजत्रेच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. मराठी कलाविश्वात सध्या अनेक कलाकार नवीन घर, गाड्या घेत आहेत. यात आत हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरची भर पडली आहे. प्रसादने नुकतीच त्याच्या नव्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : अतुल कुलकर्णी : भूमिका घेणारा, सामाजिक कामात योगदान देणारा कलावंत

प्रसाद खांडेकरने त्याचे जवळचे कुटुंबीय आणि हास्यजत्रेतील कलाकारांच्या उपस्थित नव्या घरात गृहप्रवेश केला. नम्रता संभेराव आणि गौरव मोरे हे दोघेही अभिनेत्याच्या आनंदात सहभागी झाले होते. गृहप्रवेश पूजन सोहळ्याचे फोटो प्रसादने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याची बायको, मुलगा, आई आणि इतर कुटुंबीयांची झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : सौदीत झालेली अटक ते शून्य बचत करणारा कलंदर, दिग्दर्शक अनुराग कश्यपचे न ऐकलेले किस्से

“नवीन घर…अजून एक स्वप्न पूर्ण…घर शोधायला लागले १ वर्ष, घर बांधायला गेले ६ महिने, घर सजवायला गेले २ महिने, फायनली नवीन घरात शिफ्ट झालो. जुन्या दोन्ही घरांनी भरभरून दिलं…त्या दोन्ही वास्तूंचे आभार, मोरया!” असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोंना दिलं आहे. प्रसादने नव्या घरासाठी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेली नेमप्लेट तयार करून घेतली आहे. या नेमप्लेटवर कलेसंबंधित अनेक चित्रं रेखाटलेली आहेत. व्हिडीओ कॅमेरा, पेन, कलेची दोन रुपं या नेमप्लेटवर पाहायला मिळतात.

हेही वाचा : नाटय़रंग : ‘जर तरची गोष्ट’; नात्यातले तिढे अन् वाकणांची कहाणी

दरम्यान, नवीन घर घेतल्यामुळे प्रसाद खांडेकरवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नम्रता संभेराव, ऋतुजा बागवे, अमित फाळके, प्रथमेश परब या कलाकारांनी अभिनेत्याला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.