Prithvik Pratap First New Car : आयुष्यात घडणारी पहिली गोष्ट ही नेहमीच खास असते. मग ते पहिलं घर असो किंवा पहिली गाडी… आयुष्यात मोठा संघर्ष केल्यावर हक्काचं काहीतरी घेणं ही भावना खूपच वेगळी असते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता पृथ्वीक प्रताप घराघरांत लोकप्रिय झाला. सुरुवातीच्या काळापासून संघर्ष करत त्याने आज यशाचा एवढा मोठा पल्ला गाठला आहे. नुकतीच अभिनेत्याच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली ती म्हणजे पृथ्वीकने स्वत:ची पहिली गाडी खरेदी केली आहे. याचे खास फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमांतून अनेक नवोदित कलाकारांना प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करण्याची नवीन संधी मिळाली. हास्यजत्रेच्या माध्यमातून पृथ्वीक घराघरांत पोहोचला. काही दिवसांपूर्वीच त्याने हक्काच्या घराती झलक चाहत्यांना दाखवली होती. आता आयुष्यात घेतलेल्या पहिल्या गाडीचा फोटो शेअर करत पृथ्वीकने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : नवीन होस्ट असणार रितेश देशमुख! ५ वा सीझन केव्हा सुरू होणार व कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही…

पृथ्वीक प्रतापने घेतली नवीन कार ( Prithvik Pratap )

“पाहिलेल्या स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला थोडी गती मिळावी म्हणून संयमाची चार चाके जोडतोय. तुमचं आशीर्वाद आणि प्रेम असू द्या… आयुष्यातली पहिली गोष्ट कायम खास असते म्हणून ‘सिरी’ प्लीज प्ले ‘आले तुफान किती…” अशी पोस्ट शेअर करत पृथ्वीकने पहिली गाडी खरेदी केल्याचं त्याच्या चाहत्यांना सांगितलं आहे. ही नवीन गाडी घेताना अभिनेत्यासह त्याची आई व कुटुंबीय उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या फोटोंमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : TRPच्या शर्यतीत ‘हे’ ठरले टॉप ५ कार्यक्रम! ‘झी मराठी’ वाहिनीची ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका आहे ‘या’ स्थानावर, जाणून घ्या…

Prithvik Pratap First New Car
पृथ्वीक प्रतापने घेतली नवीन गाडी ( Prithvik Pratap First New Car )

पृथ्वीकने नव्या गाडीची पोस्ट शेअर करताच यावर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्चा पाऊस पाडला आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने “कर्तुत्ववान आहेस.. सच्चेपणा आणि मेहनत अशीच असू देत.. खूप प्रेम” अशी कमेंट करत पृथ्वीकला प्रोत्साहन दिलं आहे. तर प्रियदर्शिनी इंदलकर, निखिल बने, वनिता खरात, स्पृहा जोशी, शिवाली परब, दत्तू मोरे, ऋतुजा बागवे, प्रथमेश परब, चेतन वडनेरे, ओंकार राऊत, रुपाली भोसले, रसिका वेंगुर्लेकर, अश्विनी कासार, पूजा सावंत, सई ताम्हणकर या कलाकारांनी देखील या पोस्टवर कमेंट्स करत पृथ्वीकवर ( Prithvik Pratap ) कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader