कलाकार मंडळींनी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या आगामी प्रोजेक्टविषयी माहित देत असतात. याशिवाय फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याच्या स्त्री वेशाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या अभिनेत्याने स्त्री वेशातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्त्री वेशातील रेट्रो लूकमधील या अभिनेत्याला आतापर्यंत तुम्ही ओळखलं असेलच. हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता पृथ्वीक प्रताप आहे. काल त्याने स्त्री वेशातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. देवयानी…पसंत आहे मुलगी, असं कॅप्शन देत पृथ्वीकने हे फोटो शेअर केले होते. सध्या हे पृथ्वीकचे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.

हेही वाचा – “मी माझं आयुष्य…”, लूकवरून ट्रोल करणाऱ्यांना आयशा टाकियाने दिलं चांगलंच उत्तर, म्हणाली…

पृथ्वीकच्या हे फोटो पाहून कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, अक्षया नाईक, तन्वी बर्वे, धैर्य घोलप या कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आयला घाबरलो ना, छातीत धडकीच भरली”, “आग… मरतो का काय मी”, “बाबो लय खतरनाक एकदम”, “निखळ सौंदर्य”, “मस्त भाई”, अशा अनेक प्रतिक्रिया पृथ्वीकच्या या लूकवर चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: राजकारणानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीची व्यवसायात उडी, रत्नागिरीच्या समुद्र किनारी सुरू केला सुंदर व्हिला

दरम्यान, पृथ्वीकच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वी त्याचा ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्या साथीला अभिनेता प्रथमेश परब होता. या चित्रपटातील पृथ्वीकची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतील पडली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame prithvik pratap share female character look pps