Maharashtrachi Hasya Jatra Fame Prithvik Pratap : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा उपविजेता अभिजीत सावंत ठरला. विजेतेपद हुकल्यावर सुद्धा गायकाने मोठ्या आनंदाने सूरज जिंकल्याचा आनंद साजरा केला होता. याबद्दल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने एक खास पत्र लिहून त्याचं कौतुक केलं आहे. याशिवाय २००४ पासून म्हणजे जवळपास २० वर्षांआधी अभिजीत ‘इंडियन आयडॉल’मध्ये सहभागी झाला होता तेव्हाचा किस्सा देखील पृथ्वीकने या पत्राद्वारे सांगितला आहे.

पृथ्वीक प्रतापचं अभिजीतला पत्र

मी सातवी-आठवीत असताना दिवाळीच्या दरम्यान माझ्या मामाने घरी एक MTNL landline फोन बसवून घेतलेला. ज्यावर फोन आलेला नसताना सुद्धा ‘हॅलो’ म्हणायला भारी वाटायचं. कित्येकदा तर आम्ही स्वतःच त्याची रिंग वाजवायचो जी माळ्यावरच्या आठही खोल्यांना ऐकू जायची आणि मग सगळ्यांना कळलं फोन आलाय की हॅलो म्हणायचो… खरंतर तेव्हा outgoing calls ना खूप पैसे लागायचे आणि incoming calls ना सुद्धा त्यामुळे त्या फोनचं आम्ही फक्त वोळणं करून टाकलेलं. थोडक्यात काय तर, काही काळापर्यंत ‘शायनिंग’ मारण्यापलीकडे त्या फोनचा वापर मी तरी कधी केला नव्हता.

Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…

हळुहळू वार्षिक परीक्षा ही जवळ आलेली त्यामुळे फोनबरोबर खेळत बसणं, TV बघणं हे सगळं कमी झालेलं, केबल काढून TV तर बंदच होणार होता पण, तरीही त्यातल्या त्यात, मामी, आज्जी आणि आई ‘वादळवाट, अवंतिका, वगैरे’ मालिका आवडीने पाहायच्या म्हणून केबल चालू राहिला. पण, अचानक आमच्या मामाने या लिस्ट मध्ये अजून एक कार्यक्रम Add केला… ज्याचं नाय होतं INDIAN IDOL.

‘अरे आपला एक मराठी पोरगा आहे “अभिजीत सावंत या एका feeling साठी आम्ही कार्यक्रम पाहायला सुरुवात केली आणि TV पाहण्याची वेळ थोडी आणखी वाढली. मग काय… सगळेच हा कार्यक्रम पाहताना अभिजीत सावंतच्या गोड स्माइलच्या आणि गोड आवाजाच्या प्रेमातच पडले.

सांगायचा मुद्दा हा की, INDIAN IDOL च्या फिनालेचा विजेता अभिजीत सावंतच व्हावा यासाठी जमतील तेवढे प्रयत्न केले होते. शाळेत, बिल्डिंगमध्ये जिथे जाईन तिथे अभिजीत सावंतच जिंकला पाहिजे अशी मौखिक प्रसिद्धी सतत केली. पण, फक्त तेवढं करून चालणार नव्हतं कारण तो जिंकणार की नाही हे व्होट्सवर ठरणार होतं. म्हणून, इतक्या दिवसात फोनचं खेळणं थांबवलेलं ते पुन्हा सुरु केलं.

INDIAN IDOL चा अभिजीत सावंतचा voting number गणिताच्या वहीच्या मागच्या पानावर लिहून घेतला होता. अर्थात तो आधी पाठ केला होता. १२०० २४२४ २५२५०२. हा ’02’ फार महत्वाचा होता कारण, तो चुकला तर आपलं वोट ‘अमित साना’ ला वगैरे जाऊ शकतं अशी सतत भिती होती. घरातल्यांसमोर हा फोन लावू शकत नव्हतो कारण त्याचे साधारण प्रति फोन ३ रुपये वगैरे लागणार होते. म्हणून रात्री अपरात्री सगळे झोपल्याची खात्री करून मगच अभिजीत सावंतला वोट केलंय, तो जिंकावा यासाठी खूप प्रार्थना वगैरे सुद्धा केल्यात. ज्यादिवशी तो जिंकला त्यादिवशी आमच्या बिल्डिंगमध्ये फटाके सुद्धा फोडलेले काहींनी, कारण फिलिंगच बाप होतं ना ‘मराठी माणूस जिंकल्याचं’. अभिजीत जिंकला होता तेव्हा चेहऱ्यावर तेच स्मित हास्य, रनर अप अमित सानाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सुद्धा गायला सांगितलं होतं त्याने. तेव्हाचं कळलं होतं माणूस म्हणून पण भारी आहे हा.

पुढच्या महिन्यात आलेलं फोनचं बिलं पाहून मामा गांगरला होता. त्यानंतर तो फोन बंदच ठेवण्यात आला. पुढे मामाने सॅमसंगचा मोबाईल घेतला आणि त्याचे महत्वाचे फोन उचलायला सुरुवात केली. पण, तेव्हा अभिजीत सावंत जिंकला होता.

तब्बल २० वर्षांनी त्याला आणखी एका शोमध्ये बघून खूप बरं वाटलं. पण यावेळी दोन्ही फायनलिस्ट खूपचं आवडते होते. सूरज जिंकला तेव्हा मन भरून आलं. गरिबाचं पोरं प्रस्थापितांच्या दुनियेत काहीतरी जादू करू पाहतय हे दिसलं. अभिजीत सावंत रनर अप ठरला पण, त्याच्यानंतर सुद्धा ज्या मायेने तो सूरजशी वागत होता ते बघून त्याच्याविषयी आदर आणखी वाढला. साला एकदातरी भेटलं पाहिजे या माणसाला असं वाटलं. आणि परवा फुलवंतीच्या प्रीमियरला आमची भेट झाली. मी थोडा excite झालो होतो. मी जाऊन अभिजीत सावंतला भेटलो त्याला म्हणालो… ‘hi, अभिजीत दादा खूप आवडतोस तू मला. Big Fan त्यावर एक सेकंद ही न लावता तो म्हणाला ‘अरे सेम टू यू… मी हास्यजत्रा पाहतो फार आवडीने.. infact मी तुला ‘झी मराठी’वरच्या ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेपासून बघतोय, माझी फॅमिली तुझं काम enjoy करते.

हे ऐकून मी सरप्राईज झालो. काय बोलू कळेना. त्याने मात्र खांद्यावर हात ठेवून गप्पा मारल्या फार प्रेमाने गळाभेट केली. बाजूलाच गोस्वामी सर उभे होते त्यांना सुद्धा आवर्जून भेटला. कार्यक्रम आवडतो हे सांगितलं आणि हसत हसत आणखीन एक आनंद देऊन त्याच्या गोड स्माईलने इतरांना भेटू लागला.

ही पोस्ट माझ्या त्या आवडत्या माणसाच्या कौतुकासाठी…

हेही वाचा : राज ठाकरेंवर आधारित ‘येक नंबर’ चित्रपटाने ५ दिवसांत कमावले फक्त ‘एवढे’ लाख…; जाणून घ्या कलेक्शन

दरम्यान, पृथ्वीकचं हे सुंदर पत्र वाचून अभिजीत सावंत देखील भारावून गेला आहे. “भाऊ… टू मच यार थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह” अशी कमेंट करत अभिजीतने त्याचे आभार मानले आहेत.