‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार कायम चर्चेत असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने मराठी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “पेइंग गेस्ट, भाड्याचं घर ते स्वतःचं घर”, ‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंताने मुंबईत घेतलं हक्काचं घर; पाहा फोटो

प्रियदर्शनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर नुकताच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्यासह फोटो शेअर केला आहे. हा फोटो नेमका कशासाठी काढलाय? याबद्दल काहीच माहिती न देता तिने केवळ “गेस व्हॉट” असं कॅप्शन तिने दिलं आहे. त्यामुळे या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : “माझ्या प्रिय बाळा!”, मुलांच्या जेवणाच्या डब्यासह जिनिलीया देशमुखने ठेवलं गोड पत्र; म्हणाली, “कामानिमित्त बाहेर…”

प्रियदर्शनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून संतोष जुवेकर आहे. या फोटोमध्ये दोघांचाही वेगळा आणि जुन्या काळातील लूक पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा फोटो अभिनेत्रीने कशासाठी शेअर केलाय? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Video : प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर हास्यजत्रेच्या कलाकारांची धमाल! व्हिडीओ शेअर करत वनिता खरात म्हणाली, “पार्टी करायला…”

दरम्यान, प्रियदर्शनी इंदलकर आणि संतोष जुवेकरच्या फोटोवर चाहत्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोवर ‘नव्या चित्रपटाची सुरुवात’, ‘नवीन चित्रपट येणार का?’, ‘नेमकं काय सुरु आहे?’ अशा कमेंट्स केल्या आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame priyadarshini indalkar shared photo with santosh juvekar sva 00