‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला सुद्धा हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. तिने ‘ई टीव्ही मराठी’ वाहिनीवरील ‘अफलातून लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमातून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. प्रियदर्शनी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिचे हटके वेस्टर्न लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो शेअर केल्यावर अनेकांनी तिच्या लूकचं कौतुक केलं परंतु, एका सोशल मीडिया युजरने तिला आक्षेपार्ह मेसेज केल्याचा प्रकार घडला आहे. प्रियदर्शनीबरोबर नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात…

हेही वाचा : मेरे देवता, मेरे राजे… ‘पावनखिंड’ फेम अभिनेत्याने शेअर केला रायगडावरचा फोटो; हातावरच्या टॅटूची चर्चा

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…
Rahul and Priyanka Gandhi stopped by police at Ghazipur
संभल’वरून आरोपांची चिखलफेक; राहुल गांधींचा ताफा गाझीपूर वेशीवर रोखला

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरच्या फोटोंवर एका नेटकऱ्याने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे स्क्रीनशॉट प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये नेटकऱ्याने अभिनेत्रीला अतिशय चुकीचे व विचित्र मेसेज केल्याचं पाहायला मिळत आहे. यावर प्रियदर्शनीने हे अकाऊंट रिपोर्ट करण्यासाठी मला मदत करा असं कॅप्शन लिहून त्या खालोखाल संबंधित नेटकऱ्याचं युजरनेम नमूद केलं आहे.

प्रियदर्शनीने या संपूर्ण घटनेवर एक महत्त्वपूर्ण पोस्ट शेअर करत आपलं मत नोंदवलं आहे.

प्रियदर्शनी इंदलकरची पोस्ट

अर्थात अशा कमेंट्स, मेसेज येणार!” “फोटो टाकतानाच कळायला पाहिजे”

अनेक पुरुष अशा फोटोजवर खूप gracefully comment करतात. एखादा फोटो hot वाटणं आणि ते व्यक्त करणं ही गोष्ट offensive नाही.

पण, अशा पद्धतीचे मेसेज नक्कीच offensive आहेत आणि ते ignore करत राहिलो तर हे normalise होईल. म्हणून हे सगळं लिहितेय.

आणि या उपर, फोटोचा काही संबंध नसतानाही असे अनेक मेसेज, अनेक मुलींना येत असतात, काही प्रमाणात मुलांनाही येत असतात. तर या सोशल मीडियाच्या निनावी जनतेला तसं तर आपण काही करु शकत नाही, फक्त आपल्या बाबतीत ‘रिपोर्ट’ करु शकतो.

आणि मी याबद्दल स्वत:ला खरोखर भाग्यवान समजते कारण, मला (तुलनेने) इन्स्टाग्राम परिवाराकडून खूप सकारात्मक प्रेम मिळालं आहे!

हेही वाचा : “…म्हणून आम्ही चिमीसाठी त्रिशाची निवड केली”, ‘नाळ २’ चित्रपटातील दिग्दर्शकांनी सांगितला ‘तो’ किस्सा

priyadarshini indalkar shared screenshot of offensive message of netizens
प्रियदर्शनी इंदलकरला नेटकऱ्याचे आक्षेपार्ह मेसेज

दरम्यान, प्रियदर्शनीप्रमाणे यापूर्वी अनेक अभिनेत्रींना अशा प्रकारच्या ट्रोलिंगचा, आक्षेपार्ह मेसेज, बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. सध्या अभिनेत्रीची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय नुकतीच ती ‘शांतीत क्रांती’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती.

Story img Loader