‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घरोघरी लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. हास्यजत्रेमुळे गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रचंड चर्चेत आहे. याशिवाय प्रियदर्शिनी अलीकडेच ‘नवरदेव बीएससी ॲग्री’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेली अशीच एक भावुक पोस्ट चर्चेत आली आहे.
१२ डिसेंबर २०१० म्हणजेच साधारण १४ वर्षांपूर्वी प्रियदर्शिनीच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं होतं. तिचं नाव उलका इंदलकर असं ठेवण्यात आलं. त्याकाळी ब्लू क्रॉस सोसायटीने आयोजित केलेल्या पाळीव प्राणी दत्तक मेळाव्यात अभिनेत्री व उलकाची पहिली भेट झाली. उलका ही प्रियदर्शिनीच्या घरातील श्वान होती. तिचं नुकतंच निधन झाल्याने अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
प्रियदर्शिनीने उलकाच्या आठवणीत भावुक होत २०१० मध्ये लोकसत्ता वृत्तपत्रात छापून आलेला फोटो नुकताच तिच्या इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. “१२ डिसेंबर २०१० ते २० फेब्रुवारी २०२४…आपला पहिला फोटो ते आपण एकत्र काढलेला शेवटचा फोटो…’उलका- अ शूटिंग स्टार’ या तुझ्या नावाला आता तू खरी उतरशील. रेस्ट इन पीस बडी…भेट होईलच!” असं कॅप्शन प्रियदर्शिनीने श्वानाबरोबरच्या फोटोंना दिलं आहे.
हेही वाचा : Video: आली समीप लग्नघटिका! जॅकी-रकुलच्या लग्नाला पोहोचली देशमुखांची धाकटी सून, पापाराझींची केली विचारपूस
दरम्यान, उलकाच्या निधनाबद्दल माहिती मिळताच कमेंट्स सेक्शनमध्ये नम्रता संभेराव, अनघा अतुल, शिवाली परब, सखी गोखले, रसिका सुनील या कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर प्रियदर्शिनीने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘नवरदेव बीएससी ॲग्री’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिता साकारली आहे. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते.