‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला सुद्धा हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या तिने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर असून यावर “लग्नाला ६० दिवस बाकी…” असं लिहिण्यात आलं आहे. अभिनेत्रीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘#नवरदेव आणि #जानेवारी २०२४’ असं नमूद केलं आहे. त्यामुळे प्रियदर्शनी पुढच्या वर्षी लग्न करतेय का? अशा चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत.

हेही वाचा : “हे अजिबात योग्य नाही”, मराठी निर्मात्यांवर पुष्कर जोग का संतापला? सई ताम्हणकरच्या चित्रपटाचा उल्लेख करत म्हणाला…

प्रियदर्शनीच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी “रुखवत कुठे आहे?”, “तुझ्या पत्रिकेवर नवऱ्याचं नाव नाही”, “हे प्रभु ये क्या हुआ?”, “लग्न आहे का तुझं”, “तू लग्न करतेस?” “पत्रिका पाठव आम्हाला…अभिनंदन प्रिया”, अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.” अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना अद्याप काहीच उत्तर दिलेलं नाही.

हेही वाचा : “मला मातृत्व देणाऱ्या…”, मोठ्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची खास पोस्ट; म्हणाली, “प्रिय रियान…”

दरम्यान, प्रियदर्शनीने या पोस्टमध्ये कोणालाही टॅग केलेलं नाही. त्यामुळे तिच्या आगामी नाटकाच्या प्रमोशनसाठी ही पोस्ट असेल अशी दाट शक्यता आहे. कारण, “लग्नाला ६० दिवस बाकी…”, अशी सारखीच पोस्ट ‘धर्मवीर’ फेम अभिनेता क्षितीज दातेने सुद्धा शेअर केली आहे. खऱ्या आयुष्यात क्षितीजने अभिनेत्री ऋचा आपटेशी लग्न केलं आहे. त्यामुळे २५ जानेवारी २०२४ च्या मुहूर्तावर मराठी प्रेक्षकांसाठी नेमकं काय सरप्राईज असेल याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame priyadarshini indalkar shares new cryptic post on instgram sva 00