‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम सर्वत्र लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. प्रियदर्शनी इंदलकर, निखिल बने, शिवाली परब, गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार राऊत, रोहित माने अशा बऱ्याच कलाकारांना हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. हे सगळे कलाकार घराघरांत नावाजले जाऊ लागले. प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे अनेकांची अभिनयक्षेत्रातील व वैयक्तिक आयुष्यातील अनेक स्वप्न साकार झाली. यासंदर्भात नुकतीच अभिनेता व विनोदवीर म्हणून ओळखला जाणाऱ्या रोहित माने याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित मानेने मुंबईत स्वत:च्या हक्काचं पहिलं घर खरेदी केलं आहे. अभिनेत्याचं हे घर दहिसर परिसरात आहे. नव्या घराची पहिली किल्ली आणि झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या हक्काच्या पहिल्या घराचं श्रेय रोहितने हास्यजत्रेच्या कुटुंबाला आणि पत्नी श्रद्धाला दिलं आहे. साताऱ्यात जन्म झालेला रोहित लहानपणी मुंबई आला. एवढे वर्षे तो भाड्याच्या घरात राहत होता. अखेर हक्काचं पहिलं घर खरेदी करून रोहितने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.

हेही वाचा : बॅकलेस ब्लाऊजमुळे झालेल्या वादावर स्पृहा जोशीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली, “सतत अठराशेच्या शतकातील…”

रोहित लिहितो, “मी साताऱ्यात जन्माला आलो. तिथेच वाढलो. माझे वडील कामानिमित्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी. कुटुंबापासून किती दिवस लांब राहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं. लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहिलो, काही घरांमध्ये आवडत नसतानाही नाईलाज म्हणून राहावं लागलं आणि काही घरं खूप आवडत असतानाही नाईलाज म्हणून सोडावी लागली. त्या सगळ्या प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःच हक्काचं घर असावं जे नाईलाज म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल. बरं त्यात निवडलेलं क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की, कधी घर घेण्याची हिंमतही झाली नाही पण, श्रद्धा तुझ्यासोबत लग्न झालं आणि ज्या हिंमतीने तू सगळं हातात घेतलंस त्यामुळे आणि त्यामुळेच हे शक्य झालं आहे. ही हिंमत आम्हाला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने दिली.”

हेही वाचा : ‘सापळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

“आता मी हक्काने सांगू शकतो… होय हे आमचं घर आहे. स्वप्नपूर्तीचा हाच तो अनुभव. ह्या सगळ्यात माझे आई वडील, माझे सासू सासरे, यांनी कायमचं आम्हाला दिलेली साथ मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्हा सगळ्यांचे आर्शीवाद आणि शुभेच्छा कायम आमच्या सोबत असू द्या. कायम असंच प्रेम करत राहा. या प्रवासात बरोबर असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. एका स्वप्नाचा प्रवास पूर्ण होतोय पुढच्या स्वप्नांकडे जाण्याचा ध्यास ठेवून…” असं रोहित माने याने या पोस्टमध्ये सांगितलं आहे. दरम्यान, हास्यजत्रेतील कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी अभिनेत्यावर नव्या घरासाठी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame rohit mane bought first house in mumbai shared post sva 00