Maharashtrachi Hasya Jatra Actor New Home : मुंबईत हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. गेल्या काही महिन्यांपासून सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अश्विनी महांगडे, अदिती द्रविड, शिवाली परब, मंगेश देसाई अशा बऱ्याच कलाकारांनी हक्काचं घर घेत आपली स्वप्नपूर्ती केली. काही महिन्यांपूर्वी यात आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणून रोहित माने ओळखला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasya Jatra ) या कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकार लोकप्रिय झाले. हास्यजत्रा हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम सर्वत्र लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. प्रियदर्शनी इंदलकर, निखिल बने, शिवाली परब, गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार राऊत अशा बऱ्याच कलाकारांना हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. यापैकी एक लोकप्रिय अभिनेता म्हणजे रोहित माने. काही महिन्यांपूर्वी रोहितने नवीन घर घेतलं. नव्या घराची किल्ली शेअर करत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली होती.

हेही वाचा : उर्वशी रौतेलाचा बाथरुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “असे पब्लिसिटी स्टंट…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचा नव्या घरात गृहप्रवेश

‘सुख कळले’ असं कॅप्शन देत रोहित मानेने नव्या घराची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता बायकोसह पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रोहितने त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत नव्या घरात प्रवेश केला. यावेळी या जोडप्याने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. गृहप्रवेश, जोड्याने पूजा, नव्या घरातून सुंदर व्ह्यू याची झलक अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नावर ‘या’ सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने बनवला चित्रपट, अमिताभ बच्चन यांनी दिला आवाज

रोहित माने ( Maharashtrachi Hasya Jatra )

हेही वाचा : “माझ्याबरोबर चुकीचं वागणारे आता भोगत आहेत”, घटस्फोटाबाबत अनिकेत विश्वासरावचं भाष्य; म्हणाला, “हायकोर्टाने निर्णय…”

प्रियदर्शिनी इंदलकर, सौरभ चौघुले, वनिता खरात, प्रथमेश परब यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत रोहितचं कौतुक केलं. रोहित मानेचं हे मुंबईतलं हे पहिलं घर आहे. नव्या घराची पहिली किल्ली आणि झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. साताऱ्यात जन्म झालेला रोहित लहानपणी मुंबई आला. एवढे वर्षे तो भाड्याच्या घरात राहत होता. अखेर हक्काचं पहिलं घर खरेदी करून रोहितने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.