‘महाराष्ट्राची हास्यज’त्रा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. त्यातील एक म्हणजे समीर चौघुले. समीर चौघुले यांना हास्यवीर म्हणूनही ओळखले जाते. आपल्या विनोदी अभिनयाने ते प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. समीर चौघुले यांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे.
सोशल मीडियावर समीर चौघुले नेहमी सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे समीर चौघुले यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. मात्र, चौघुले आता आणखी एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. कथाकथनाच्या या कार्यक्रमात प्रेक्षकांना समीर चौघुलेंकडून धमाल किस्से ऐकायला मिळणार आहेत.’
हेही वाचा- अनघा अतुलनंतर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सुरू केलं स्वत:चं हॉटेल, नाव आहे खूपच खास, पाहा झलक
चौघुलेंनी पोस्टमध्ये लिहिले “भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व बांधवांना आणि भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा. आजवर माझ्या प्रत्येक कामावर आपण सर्वांनी भरभरून प्रेम केलंत. त्याच जोडीला नवीन काहीतरी घेऊन येतोय. हलकफुलक, मनावर हळूवारपणे मोरपीस फिरवता फिरवता अलगद गुदगुल्या करून पोटधरून हसवणारं. एखाद्या जुन्या pant च्या खिशात ५०० ची नोट मिळवून देणारं. तुमचं, आमचं, अगदी आपलं घेऊन येतोय अगदी लवकरचं. प्रेम आणि आशिर्वाद असू दे.” चौघुलेंची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी त्यांना या नवीन कार्यक्रासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
समीर चौघुले यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहे. पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. मालिकांबरोबर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांतही काम केले आहे