Maharashtrachi Hasya Jatra Comedy Show : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या कार्यक्रमामुळे शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, पृथ्वीक प्रताप, निखिल बने, ओंकार राऊत अशा अनेक कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. याशिवाय हास्यजत्रेमधून इंडस्ट्रीतील अनेक नवाजलेले कलाकार देखील नव्याने नावारुपाला आले. या सगळ्या कलाकारांमध्ये एक सुंदर असं बॉण्डिंग आहे. एकत्र ट्रिपला जाणं, एकमेकांना गिफ्ट्स देणं, कौतुक करणं, सोशल मीडिया पोस्ट शेअर करणं या सगळ्या माध्यमांतून आपण या कलाकारांमध्ये असलेलं बॉण्डिंग पाहतो.
सध्या शिवाली परबने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट अभिनेत्रीने खास समीर चौघुले यांच्यासाठी शेअर केली आहे. आपल्या विनोदाचं अचून टायमिंग साधत समीर चौघुलेंनी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasya Jatra ) या कार्यक्रमात ते लेखक म्हणून देखील जबाबदारी सांभाळतात. कामाव्यतिरिक्त ते नव्याने इंडस्ट्रीत आलेल्या कलाकारांचं देखील मनोबल उंचावतात. अशाच आशयाची पोस्ट शिवालीने समीर चौघुलेंसाठी शेअर केली आहे.
समीर चौघुलेंकडून शिवालीला मिळालं खास गिफ्ट ( Maharashtrachi Hasya Jatra )
शिवालीने समीर चौघुलेंबरोबर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात कॅडबरी असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री लिहिते, “चांगला परफॉर्मन्स केल्याबद्दल मिळालेलं हे बक्षीस… ही माझी चौथी कॅडबरी आहे… अजून मिळवायच्या आहेत.” याचबरोबर समीर चौघुले यांचे आभार मानत शिवालीने त्यांना या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.
![Maharashtrachi Hasya Jatra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/image_f4403f.png?w=319)
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील सगळेच कलाकार कायम एकमेकांना प्रोत्साहन देत असतात. काही दिवसांपूर्वीच या सगळ्या कलाकारांनी मिळून वनिता खरातचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला होता. तर, नुकतेच हे सगळे कलाकार पावसाळी ट्रिपसाठी फिरायला गेले आहेत.
हेही वाचा : “माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना
शिवालीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष करून अभिनेत्रीने यशाचा हा टप्पा गाठला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने हक्काचं घर खरेदी करत स्वप्नपूर्ती केली.