‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील हास्यवीर आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. या कॉमेडी शोमुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. ओंकाज भोजने, वनिता खरात, गौरव मोरे, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप या सगळ्याच कलाकारांना या कार्यक्रमामुळे सर्वत्र लोकप्रियता मिळाली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अशा विविध ठिकाणी हास्यजत्रेच्या कार्यक्रमाचे दौरे होत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेलं आणखी एक मोठं नाव म्हणजे अभिनेते समीर चौघुले. अभिनेते समीर चौघुलेंना या कार्यक्रमामुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. अभिनयाबरोबरच ते उत्तम लेखक म्हणून देखील ओळखले जातात. हास्यजत्रेतील अनेक गाजलेल्या स्किटचं लेखन समीर चौघुलेंनी केलेलं आहे.

हेही वाचा : Video : “माझी आई पन्नाशीनंतर गाडी चालवायला शिकली”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याची खास पोस्ट; म्हणाला…

आजवर नाटक, चित्रपट, मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ते सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत चौघुले प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. आज त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुले यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : १७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

समीर चौघुले यांची पत्नीसाठी खास पोस्ट

समीर चौघुले यांच्या पत्नीचं नाव कविता चौघुले असं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत अभिनेते लिहितात, “कविता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी देवाचे खूप खूप आभार…तुझ्याविना माझं सतत ‘अडणं’ असंच कायम राहू दे…खूप प्रेम तुला…बायकोचा वाढदिवस”

हेही वाचा : थिएटर्स नाही तर थेट OTT वर येतोय ‘हा’ मराठी सिनेमा; भुषण प्रधान, प्रार्थना बेहेरे अन् सयाजी शिंदेंच्या आहेत भूमिका

हेही वाचा : ‘हीरामंडी’मधील ‘त्या’ सीननंतर अभिनेता ढसाढसा रडला; भारावलेल्या संजय लीला भन्साळींनी दिलं ‘हे’ बक्षीस

दरम्यान, समीर चौघुलेंनी शेअर केलेल्या पोस्टवर चेतना भट, वनिता खरात, सुकन्या मोने, प्रसाद ओक व त्याची पत्नी मंजिरी, ऋजुता देशमुख, अमित फाळके या कलाकारांनी व अभिनेत्याच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट्स करत कविता चौघुले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame samir choughule shares special post on the occasion of wife birthday sva 00