‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री शिवाली परब घराघरांत लोकप्रिय झाली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली अनेक वर्षे तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून आज शिवालीने कलाविश्वात यश मिळवलं आहे. सध्या अभिनेत्री तिच्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. ‘हार्टबीट वाढणार हाय’ हे शिवालीचं नवीन गाणं सध्या सर्वत्र ट्रेंड होतंय. याच निमित्ताने तिने नुकतीच ‘मीडिया टॉल्क मराठी’ला मुलाखत दिली.

शिवाली परबने यावेळी वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीबद्दल खुलासा केला आहे. येत्या मे महिन्यात अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी आहे. सध्या मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी नवीन गाडी, नवं घर घेतल्याचं आपण पाहिलं. आता या यादीत शिवालीचं नाव जोडलं जाणार आहे.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…

हेही वाचा : खरा कोकणी माणूस! रेल्वे अन् एसटीतून प्रवास करत चिपळूणला पोहोचला प्रसिद्ध अभिनेता, नेटकरी म्हणाले…

शिवाली परबला तिच्या वाढदिवसासाठी काय तयारी करणार याबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, “यंदा वाढदिवसासाठी असं काही स्पेशल नाहीये. ही गोष्ट अजून मी कुठेच सांगितलेली नाही. पण, आता सांगते…मी घर घेतलंय. या नवीन घराची पूजा मी १० तारखेला ठेवलेली आहे. हे सगळं नक्कीच प्रेक्षकांमुळे शक्य झालंय. त्यामुळे हा वाढदिवस माझ्यासाठी खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे.”

हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुन-चैतन्यमध्ये दिलजमाई! अखेर साक्षीचा खोटेपणा होणार उघड, साखरपुडा मोडणार? पाहा नवीन प्रोमो…

मे महिन्यात १० तारखेला शिवालीच्या या नवीन घरात पूजा पार पडणार आहे. तेव्हाच अभिनेत्री तिच्या सगळ्या चाहत्यांना व प्रेक्षकांना नवीन घराची झलक दाखवणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी नवीन गाड्या व नवीन घर घेतल्याचं पाहायला मिळालं. आता या यादीत शिवालीचं नाव जोडलं जाणार आहे.

दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हार्टबीट वाढणार हाय’ या गाण्यात शिवालीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळात आहे. या गाण्याला अभिनेत्रीचे चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Story img Loader