मराठी मनोरंजनक्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे श्रेया बुगडे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया घराघरांत पोहचली. आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रेयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता अभिनयाबरोबर श्रेयाने हॉटेल क्षेत्रात पदार्पण केले आहे. नुकतेच तिने आपले स्वत:चे रेस्टॉरंट उघडले आहे.
श्रेयाने मुंबईतील दादर परिसरात स्वत:चे रेस्टॉरंट उघडले आहे. २६ जानेवारीला आपल्या नव्या रेस्टॉरंचे उद्धाटन केले. या उद्धाटन सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. ‘द फिश बिग कंपनी’ असे तिच्या नव्या रेस्टॉरंटचे नाव आहे. या रेस्टॉरंटमध्ये आता खवय्यांना माशांचे वेगवेगळे प्रकार चाखायला मिळणार आहे. श्रेयाने दादरमध्ये रेस्टॉरंट का उघडले असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. आता नुकतेच एका मुलाखतीत श्रेयाने याबाबतचा खुलासा केला आहे.
श्रेयाने नुकतेच राजश्री मराठीला मुलाखत दिली या मुलाखतीत तिने आपल्या नव्या रेस्टॉरंटबाबत अनेक खुलासे केले आहेत. श्रेया म्हणाली, “दादर नेहमीच गजबलेलं असतं. दादर मुंबई २८ हा आपला पत्ता असला पाहिजे हे आमचं स्वप्न होतं. आमचं रेस्टॉरंट दादरच्या मध्यभागी आहे. आता मी रोज दोन तास कांदिवलीमधून दादरमध्ये येऊन हा व्यवसाय सांभाळणार आहे.”
श्रेयाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. कॉमेडी क्वीन’ म्हणूनही तिला ओळखले जाते. नाटक, मालिका चित्रपटांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आली आहे. आता अभिनयाबरोबर श्रेय़ाने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकले आहे.