Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor Wedding Photo : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार आयुष्याची नवीन सुरुवात करत लग्नबंधनात अडकले. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. मराठी मालिका तसेच नाटकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता सनीभूषण मुणगेकर विवाहबंधनात अडकला आहे. लग्नसोहळ्यातील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

सनीभूषण मुणगेकरने लग्नातील फोटो शेअर करत त्यावर “स्वप्नवत सत्यात… श्री व सौ मुणगेकर” असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्याने दिपश्री कवळेशी लग्नगाठ बांधली आहे. सनीभूषण आणि दिपश्री या दोघांनी लग्नसोहळ्यात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. दिपश्रीन सुद्धा कलाविश्वात सक्रिय आहे. अभिनेत्रीने लग्नसोहळ्यात पिवळ्या रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, डोक्याला मुंडावळ्या, पिवळ्या नऊवारी साडीवर गुलाबी शेला असा लूक केला होता. तर, सनीभूषणने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती.

Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Akshaya Hindalkar
दीड वर्ष चालता येत नव्हतं, हातातली मालिका गेली अन्…; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम अभिनेत्रीचा झालेला अपघात, म्हणाली…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

हेही वाचा : Video: ‘टाइमपास’ दिग्दर्शक रवी जाधव यांनी घेतलं नवं आलिशान घर, वास्तुशांतीचे खास क्षण शेअर करत म्हणाले, “गावातील छोट्याशा घरातून…”

अभिनेता सनीभूषण मुणगेकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, सध्या तो जागतिक रंगभूमीवर वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या मराठी बालनाट्यात काम करत आहे. या नाटकाचं नाव आहे अलबत्या गलबत्या. या बालनाट्याला लहान मुलांसह वरीष्ठ मंडळींचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सनीभूषण मुणगेकरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याशिवाय अभिनेता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सुद्धा झळकला होता. या शोद्वारे त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. तसेच सनीभूषणने ‘सन मराठी’ वाहिनीच्या ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेत सुद्धा काम केलेलं आहे.

हेही वाचा : “My सर्वस्व मेहुल पै…”, लग्नाच्या वाढदिवशी अभिज्ञा भावेची पतीसाठी रोमँटिक पोस्ट; मराठी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

हेही वाचा : Bigg Boss 18: चाहत पांडेच्या आईने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना दिलं खुलं आव्हान, २१ लाखांचं बक्षीस केलं जाहीर; का, कशासाठी? जाणून घ्या…

Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor Wedding
मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात ( Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor Wedding )

दरम्यान, सनीभूषणची पत्नी दिपश्रीबद्दल सांगायचं झालं, तर ती सुद्धा मराठी कलाविश्वात सक्रिय असते. दिपश्रीने आजवर अनेक नाटकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय ‘बाळुमामाच्या नावाने चांगभलं’, ‘गाथा नवनाथांची’, ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकांमध्येही ती झळकली आहे.

Story img Loader