‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेत्री वनिता खरातला सुद्धा हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. वनिता खरात आणि गौरव मोरेने हास्यजत्रेचं विजेतेपद पटकावलं होतं. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून हास्यजत्रेत सहभागी झाल्यावर अभिनेत्रीने कशी तयारी केली? याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वनिताने खुलासा केला आहे.

हेही वाचा : “…अन् अमृता खानविलकरने मला खूप शिव्या घातल्या”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘रानबाजार’ सीरिजचा किस्सा, म्हणाली…

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial
भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”

वनिता खरात म्हणाली, “महाविद्यालयात होणाऱ्या एकांकिका स्पर्धांमधून माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. हास्यजत्रेच्या आधी मी आणखी एका विनोदी कार्यक्रमात कामं केलं होतं. त्यानंतर मी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सहभागी झाले. पहिल्याच दिवशी मला गौऱ्याची आणि माझी जोडी असेल असं कळालं. यापूर्वी एकांकिका स्पर्धांमध्ये काम केलेलं असल्याने मी गौऱ्याला अनेक वर्षांपासून ओळखत होते. तो सुद्धा आधी एकांकिका करायचा. पण, आम्ही दोघांनी एकत्र असं काम केलं नव्हतं.”

हेही वाचा : “जवानमध्ये एवढ्या मुली कशाला?”, चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानने दिलं स्पष्ट उत्तर, सर्वत्र होतंय कौतुक

अभिनेत्री पुढे म्हणाली, “हास्यजत्रेमधील एलिमिनेशनची मला फार भिती वाटायची आणि एकंदर दिग्गजांसमोर काम करण्याचं थोडफार दडपण होतं. आम्हाला प्रत्येकाला टीमनुसार सेटवर एक वेगवेगळी रुम देण्यात आली होती. त्या रुमच्या भिंतीवर आम्ही दोघांनी पहिल्याच दिवशी लिहून ठेवलं होतं की, महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या पहिल्या पर्वाचे विजेते गौरव आणि वनिता होणार…असं आम्ही लिहून ठेवलं होतं.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ‘हा’ आहे चिडका बिब्बा; समीर चौघुले म्हणाले…

“सुरुवातीला प्रचंड स्पर्धा होती. अनेक नवे कलाकार येत होते…एलिमिनेशन प्रत्येक एपिसोडला सुरु होतं. आम्हाला तेव्हा तगडी स्पर्धा श्रमेश आणि प्रथमेश द्यायचे. कारण, ते दोघेही खूप सुंदर स्किट सादर करायचे. गौरव आणि माझ्या पहिल्या पर्वातील शेवटच्या स्किटला खूप धमाल आली होती. गौरव साधू बनून बाकावर बसला होता आणि मी पटकन येऊन त्याच्या मांडीवर बसले…मी उठले आणि गौऱ्या बाकाच्या आतमध्ये गेला होता…सेटवर सर्वत्र गोंधळ होऊन गौरवसाठी पळापळ सुरु होती. अखेर आमचं स्वप्न साकार झालं आणि आम्ही जिंकलो. आताही जबाबदारी वाढल्याने प्रचंड दडपण असतं.” असं वनिता खरातने सांगितलं.

Story img Loader