‘चला हवा येऊ द्या फेम’ अभिनेत्री स्नेहल शिदमचा आज वाढदिवस आहे. चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तसेच मराठी अभिनयसृष्टीतील तिचे मित्र-मैत्रिणीही तिला शुभेच्छा देत आहेत. काही जणांनी तिच्यासाठी पोस्ट टाकल्या आहेत. तर काहींनी इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बने यानेही स्नेहलला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – Photos: गावाकडचे कौलारू घर, कुटुंब, समुद्रकिनारा अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेची कोकणात फॅमिली ट्रिप
काही महिन्यांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या फेम’ स्नेहल शिदमने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बने याच्याबरोबर एक रोमँटिक फोटो पोस्ट केला होता. या फोटोनंतर या दोघांचं अफेअर असल्याची खूप चर्चा झाली होती. पण, दोघांचं अफेअर नसून ते चांगले मित्र आहेत. निखिलने स्नेहलच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो पोस्ट केला आहे. निखिलने ‘Happy Birthday Shiduuu’ असं लिहून स्नेहलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
![nikhil bane birthday wishes to snehal shidam](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/06/nikhil-bane-birthday-wishes-to-snehal-shidam.jpeg?w=277)
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने सध्या ब्रेक घेतला आहे. त्यामुळे यातील कलाकार विविध ठिकाणी फिरत आहेत. निखिलही काही दिवसांपूर्वी कोकणातील गावी गेला होता. त्याने कोकणातील घराचे व फॅमिली ट्रीपचे काही फोटो शेअर केले होते.