महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही मनसेच्या वतीने दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. याचे औचित्य साधत अनेक राजकीय नेतेमंडळींसह कलाकारांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच या दिपोत्सवाला हजेरी लावली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे अनेक विनोदवीर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते, निवेदिता सराफ, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळी या कलाकारांनीही शिवतीर्थावर हजेरी लावली.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून निखिल बनेला ओळखले जाते. अभिनयाच्या आणि उत्तम विनोदाच्या मदतीने त्याने त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाला निखिल बनेने भेट दिली. यावेळी त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “गणपतीपुळे येथील हॉटेलमध्ये मी स्वतः …” फसवणुकीच्या प्रकरणावर मधुराणी प्रभुलकर स्पष्टच बोलली
निखिल बनेची इन्स्टाग्राम पोस्ट
“दोन वर्षांनंतर माझ्या आयुष्यातली दिवाळी अशी साजरी होईल अस वाटलं देखील नव्हत. शिवाजी पार्क दिपोत्सवा निमित्त राज साहेबांच्या निवासस्थानी म्हणजेच “शिवतीर्थावर” जाण्याचा योग आला. साहेबांनी आमच्या टीमशी खूप गप्पा मारल्या ते दोन तास म्हणजे एक अनुभूती होती. टीव्हीवर भाषण ऐकत, त्यांच्या भाषणांच्या चर्चा ऐकत मोठा झालो, कधीही पार्कात गेलो की “ए राज साहेब इथे राहतात ना” मित्रांमध्ये अशी कुजबूज असायची आणि आज त्याच घरी त्यांचा कुटुंबासोबत बसून काही आनंदाचे, सुखाचे क्षण घालवले.
एक साधं,सरळ आणि कलाकारांवर प्रेम करणारं कुटुंब. राज ठाकरे आणि अमित ठाकरे… ही अनुभूती शक्य झाली ती फक्त “हास्यजत्रा आणि सोनी मराठीमुळेच, धन्यवाद सोनी मराठी, सचिन गोस्वामी, सचिन मोटे”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : विशाखा सुभेदारपाठोपाठ आणखी एका विनोदवीराची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’मधून एक्झिट, चर्चांना उधाण
निखिलने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यात त्याने काही फोटोही पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोत तो राज ठाकरेंच्या बाजूला उभा असल्याचे दिसत आहे. तर एका फोटोत तो आणि अमित ठाकरे एकत्र दिसत आहेत. निखिल बनेची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. त्यावर अनेक कलाकार कमेंटही करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.