‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय मराठी कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारे कलाकारही त्यांच्या काही पात्रांमुळे खूप लोकप्रिय झाले आहेत. मुख्य म्हणजे हे कलाकार प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवतात. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे निखिल बने होय.

हेही वाचा – अरशद वारसीच्या मुलीला पाहिलंय का? खूपच सुंदर दिसते ‘सर्किट’ची लेक, फोटो व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे घरोघरी ओळखला जाणारा निखिल बने हा अगदी सामान्य कुटुंबातला आहे. या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. निखिलचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. तो त्यांच्याबरोबर अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असतो. निखिल सध्या कोकणातील गावी गेला आहे. त्या गावातील फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

निखिलने चिपळून इथल्या घराचे व निसर्गाचे काही अप्रतिम फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये त्याचं टुमदार कौलारू घर पाहायला मिळत आहे.

nikhil bane home
निखिल बनेचं कोकणातील घर

दुसऱ्या कोलाजमध्ये त्याने कोकणातील समुद्र, नारळाची झाडं, समुद्राचं पाणी व त्यावरील सूर्यप्रकाश असे सहा क्षण टिपले आहेत. त्याने शेअर केलेले हे फोटो प्रचंड सुंदर आहेत.

nikhil bane home 2
निखिल बनेने शेअर केलेला फोटो

कोकणातील निसर्गरम्य वातावरण, समुद्र, तिथली घरं या सगळ्या गोष्टी निखिलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत.

Story img Loader