‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, रसिका वेंगुर्लेकर, गौरव मोरे, निखिल बने, रोहित माने या सगळ्या कलाकारांना हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली.

हेही वाचा : Sonali Kulkarni Birthday: सोनाली कुलकर्णीला पहिला सिनेमा कसा मिळाला? वाचा माहीत नसलेला किस्सा!

jayam ravi changed his name
दाक्षिणात्य सुपरस्टारचा मोठा निर्णय! सिनेविश्वात २० वर्षे ज्या नावाने ओळख मिळाली, तेच बदलणार…; स्वतः घोषणा करत म्हणाला…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
Navri Mile Hitlarla
लवकरच लीला-एजे हटके लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला; त्यांचा नवीन अवतार पाहताच नेटकरी म्हणाले, “आमचे पुष्पा-श्रीवल्ली…”
kokan hearted girl ankita walawalkar angry on false claim
“खोटं बोलून, माझं नाव वापरून…”, अंकिता प्रभू वालावलकर भडकली; म्हणाली, “आमच्या लग्नासाठी…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रामुख्याने लॉकडाऊनच्या काळात प्रचंड लोकप्रिय झाला. इतर कोणतेही कार्यक्रम टेलिव्हिजनवर सुरू नसल्याने घराघरांत हास्यजत्रा पाहिली जायची. ‘कोहली फॅमिली’, नम्रताचं ‘लॉली’ पात्र, समीर चौघुलेंच्या विनोदाचं अचूक टायमिंग यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. परंतु, आजच्या घडीला महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं आधीचं नाव काहीतरी वेगळंच ठरलं होतं असा खुलासा दिग्दर्शकांनी केला आहे.

हेही वाचा : अंकिता लोखंडेचा Bigg Boss 17 मध्ये जाण्याचा निर्णय वाईट, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचं मत; म्हणाली, “शेवटी तुझ्यासाठी…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे दोन प्रमुख आधारस्तंभ म्हणजेच दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिम मोटे यांनी नुकतीच भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’ला हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनी हास्यजत्रेचं नाव आधी वेगळंच ठरवलं गेलं होतं याबद्दल खुलासा केला.

हेही वाचा : … अन् एका रात्री सोहेल खानबरोबर पळून गेली होती सीमा सजदेह; म्हणाली, “त्याच्या सभोवताली अनेक सुंदर स्त्रिया…”

सचिन मोटे म्हणाले, “हास्यजत्रेचं नाव सुरूवातीला आम्ही ‘कॉमेडीचे जहागीरदार’ असं ठरवलं होतं किंवा ‘एकच पंच हादरुन टाकू मंच’ अशी नावं आम्ही काढली होती. पण, शेवटी महाराष्ट्राची हास्यजत्रा यावर शिक्कामोर्तब केलं.” नाव बदलण्यामागचं कारण सांगत सचिन गोस्वामी म्हणाले, “आम्ही काही दिवसांनी हास्याची जत्रा करायची…म्हणजेच लोकांना हसवण्याची जत्रा अशा अर्थी नाव घ्यायचं असं ठरवलं. आता या जत्रेत संपूर्ण महाराष्ट्र सामावला पाहिजे अशी आमची इच्छा होती. त्यावरून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हे नाव निश्चित झालं.” दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे. लवकरच यामधील बहुतांश कलाकार आता ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

Story img Loader