‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला. या कार्यक्रमातील सगळीच पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे यांनी आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. प्रभाकर मंचावर सादर करत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडतं. प्रभाकर मोरेंचा आज वाढदिवस आहे. समीर चौघुले यांनी पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
समीर चौघुले आणि प्रभाकर मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रेतील प्रसिद्ध कलाकार आहेत. हास्यजत्रेतील हास्यवीर विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. हास्यजत्रेमुळे अभिनेता समीर चौघुलें आणि प्रभाकर मोरे यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत चौघुले प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. समीर चौघुले आणि प्रभाकर मोरे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
समीर चौघुलेंची पोस्ट
हॅप्पी बर्थ डे Prabhakar More …आमचा हास्य जत्रेचा “कातील मोरे”…..आमच्या मोरेंचा swag च वेगळा आहे….याच टायमिंग, पंच टाकण्या आधी घेतलेला stance सगळंच अफाट आहे…कोकणी मातीतला कलाकार मालवणी बाणकोटी भाषेत मंचावर अक्षरशः धुमाकूळ घालतो…विशेषतः multi millioner वगैरे भूमिकेत हा तुफान भाव खाऊन जातो…जगप्रसिद्ध शालू या नृत्य प्रकाराचा हा जनक आहे…. स्वभावाने अत्यंत साधा सरळ…. रंगभूमीवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव, साक्षात बाबूजी म्हणजेच मच्छिंद्र कांबळी यांच्याबरोबर वस्त्रहरण या नाटकात काम करण्याचा भाग्य आमच्या प्रभाकरला लाभलंय….मित्रा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
प्रभाकर हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. त्यांनी सुप्रसिद्ध निर्माते आणि लेखक संतोष पवार यांच्या नाटकांतून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
म